Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लॉस एंजेलिस : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७०० मरीन कमांडो तैनात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

लॉस एंजेलिस : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७०० मरीन कमांडो तैनात

admin
Last updated: 2025/06/10 at 6:58 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 10 जून (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘नॅशनल गार्ड’च्या सैनिकांची कुमक तैनात केली होती. मात्र त्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झालं आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी नॅशनल गार्डच्या मदतीसाठी सुमारे ७०० ड्युटी मरीन कमांडो पाठवले आहेत. त्यामुळे आता कॅलिफोर्नियात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सुरु करण्यात आलेल्या इमिग्रेशन मोहिमेविरोधात लॉस एंजेलिसमध्ये गेल्या चार दिवसांपासून आंदोलन भडकले आहे. बेकायदा स्थलांतरितांच्या घरावर छापे टाकल्यानंतर तिथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने गव्हर्नरच्या संमतीशिवाय नॅशनल गार्ड तैनात केले. त्यामुळे आंदोलनाचा जोर आणखी वाढला. आता ट्रम्प यांनी शहरात २,१०० नॅशनल गार्ड सैनिकांच्या मदतीसाठी ७०० मरीन कमांडो तैनात केले आहेत.

दरम्यान, आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी नॅशनल गार्डच्या सैनिकांनी अश्रुधुराचा वापर, स्फोटके आणि रबरी गोळ्यांचा वापर केला. प्रत्युत्तर देताना, आंदोलकांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक केली आणि कचरा जाळून रस्ते अडवले. शुक्रवारी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कागदपत्रे नसलेल्या बेकायदा स्थलांतरितांवर छापे टाकले आणि परिसरात तणाव वाढला आहे. या छाप्यांमध्ये लॉस एंजेलिसच्या फॅशन डिस्ट्रिक्ट आणि होम डेपोमध्येही छापे टाकण्यात आले. एका आठवड्यात शहरात अटक केलेल्या स्थलांतरितांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे.

You Might Also Like

भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू

नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड

देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

कुलगाममध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केरळमध्ये कोरोनानंतर आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ
Next Article सोलापुरात उजनी धरणात ७८.५३ टीएमसी पाणीसाठा

Latest News

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला
महाराष्ट्र August 2, 2025
परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप
महाराष्ट्र August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?