Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महात्मा फुले कृषि विद्यापीठाला आंबा विक्रीतून मिळाले 1 कोटी 84 लाखाचे विक्रमी उत्पन्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला आंबा विक्रीतून मिळाले 1 कोटी 84 लाखाचे विक्रमी उत्पन्न

admin
Last updated: 2025/04/20 at 3:03 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 20 एप्रिल (हिं.स.) :- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे विभाग व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील आंबा फळांच्या लिलावातून विक्रमी 1 कोटी 84 लाखाचे उत्पन्न विद्यापीठा ला मिळाल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख तथा कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी दिली.

बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावरील अ/ब विभाग, मध्यवर्ती रोपवाटिका, ई विभाग प्रक्षेत्र यावरील 6,126 झाडे व उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील 3,071 झाडे अशा केशर, लंगडा, वनराज, तोतापुरी या आंबा फळ वाणांची ई-निविदा प्रणालीने विक्री करण्यात आली. बियाणे विभागांतर्गत असलेल्या प्रक्षेत्रा वरील झाडांपासून 1 कोटी 13 लाख व उद्यानविद्या विभागा च्या रोपवाटिकेतील आंबा फळझाडांपासून 71 लाख असे एकूण 1 कोटी 84 लाखांचा महसूल विद्यापीठाला मिळाला आहे.विद्यापीठाकडील आंबा चवीष्ट व गुणवत्तापूर्ण असल्या मुळे मुंबई, ठाणे, पालघर येथील व्यापार्‍यांनी खरेदीसाठी मोठा प्रतिसाद नोंदवला.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली व बियाणे विभागाचे प्रमुख तथा कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनात सर्व प्रभारी अधिकारी यांनी योग्य वेळेत खते, औषध फवारणी, व फळधारणेच्या काळात योग्य पाण्याची व्यवस्था केल्या मुळे झाडांना चांगल्या प्रकारची फळधारणा दिसून आली. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार्‍यांची आंबा बागा खरेदीसाठी चढाओढ निर्माण झाली. विद्यापीठाचे नियंत्रक सदाशिव पाटील यांनी ई- निविदा उघडताना योग्य त्या लेखासंहितेचा अवलंब करून अचूक मार्गदर्शन केले.

डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनाखाली मध्यवर्ती रोप वाटिका प्रभारी अधिकारी प्रा. मंजाबापू गावडे, ई विभागाचे प्रभारी अधिकारी प्रा.एस.व्ही पाटील व अ/ब विभागाचे प्रभारी अधिकारी प्रवीण बन तसेच उद्यानविद्या विभागां तर्गत असलेल्या रोपवाटिकेचे प्रमुख डॉ. सचिन मगर यांनी आंबा फळ उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले. आंबा फळांची योग्य वेळेत विक्री होण्यासाठी प्रा. बी.टी. शेटे, डॉ. के.सी. गागरे, डॉ. रश्मी भोगे, डॉ. माने,अभिजीत सांगळे, संगीता माने व संदीप कोकाटे यांनी योग्य व अचूक नियोजन केले.

You Might Also Like

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही : पुणे मनपा आयुक्त

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिवरे बाजारच्या डोंगराला वणवा; पाच तासांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण
Next Article crime सोलापूर – हब्बू वस्तीतील भीमगीतांच्या कार्यक्रमात राडा, धारदार शस्त्राने मारहाण

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?