सांगोला – ट्रकची तोडफोड करीत घरात घुसून कोयता,दगड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या महाराणीत तिघेजण जखमी झाले. ही घटना महुद (ता.सांगोला) येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगोल्याच्या पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . संजय बिरा घोडके (वय २४ रा.महुद) यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी तानाजी सुनील लवटे त्याचे दोन भाऊ विकास आणि शिवाजी लवटे, अशोक मारुती इरकर आणि सुनील लवटे (सर्व रा.महूद) या सर्वावर गुन्हा दाखल केला.
गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घोळके यांची घरासमोर लावलेल्या ट्रकची तोडफोड केली. आणि त्यांच्या घरात घुसून कोयता आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यात संजय आणि त्यांचे भाऊ अजय घोडके हे दोघे जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या आईच्या गळ्यातील बोरमाळ तोडून नेली.असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास हवालदार काजी करीत आहेत.