Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; शरद पवारांच्या उपस्थितीत केले भाजपा नेत्यांने विधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; शरद पवारांच्या उपस्थितीत केले भाजपा नेत्यांने विधान

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 9:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री व्हावी, असं विधान भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात हा प्रकार घडला.

आशिष शेलार असे त्या भाजप नेत्याचे नाव आहे. हे विधान केल्यानं याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत असताना शेलार यांनी केलेल्या विधानानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. असे विधान आणि शरद पवारांच्या उपस्थितीत का, केले याबाबत खळबळ माजली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. ‘मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,’ असं शेलार म्हणाले.

* एकाच दगडात अनेक पक्षी मारले

आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेकांनी शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भाजपमध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. या निवडणुकीच्या प्रभारीपदी आमदार अतुल भातखळकर यांची नेमणूक करण्यात आली. या बैठकीला शेलार अनुपस्थित होते. ही नाराजी या ठिकाणी बाहेर आल्याचेही बोलले जात आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #मराठा #महिलामुख्यमंत्री #शरदपवारांच्या #उपस्थिती #भाजपा #नेत्यांमागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिमाचल प्रदेशातील गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह
Next Article ठाकरे परिवाराचा व्यवसाय कोणता ? मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावे

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?