Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठी चित्रपटसृष्टीची आई गेली, 250 हून अधिक चित्रपटात केले काम, सुलोचनादीदींचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीची आई गेली, 250 हून अधिक चित्रपटात केले काम, सुलोचनादीदींचे निधन

Surajya Digital
Last updated: 2023/06/04 at 9:03 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी 94 व्या वर्षी आज अखेरचा श्वास घेतला आहे. कला विश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Mother of Marathi cinema passed away, worked in more than 250 films, Sulochnadidi passed away मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. मराठी चित्रपटसृष्टीची आई गेली. मराठी चित्रपटसृष्टी ही पोरकी झाली अशी भावूक प्रतिक्रिया उषा यांनी दिली. त्यांच्या सर्व भूमिका ह्या प्रेक्षकांच्या मनाला भावल्या. त्या भूमिका जगत असत असेही उषा म्हणाल्या.

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईच्या सुश्रूषा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या सारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्या मुळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यांनी आज 94 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यात अनेक चित्रपट प्रेक्षकांना दिले. त्यांनी मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुलोचना यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला असून त्यांनी सिनेसृष्टीत 1943 मध्ये पदार्पण केले. त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. आजही चाहत्यांच्या मनात त्यांची सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा कायम आहे.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे आज निधन झाले. त्यांनी 1946 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी अली घरा, साधी माणसे, एक डाव भूताचा, जिवाचा सखा, पतिव्रता, सुखाचे सोबती, मोलकरीण, भाऊबीज, आकाशगंगा आणि धाकटी जाऊ यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले.

खासदार सुप्रिया सुळेंनी श्रद्धांजली वाहिली. ‘हि बातमी अतिशय दुःखद आहे. गेली काही दशके त्यांनी हिंदी, मराठी भाषेत रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे ट्वीट त्यांनी केले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

Age doesn't scare me: Sulochana Latkar on her birthday.
Sulochana Latkar, who has played on-screen mother to actors Dilip Kumar, Sunil Dutt and Amitabh Bachchan.
Team FilmCity Wishes the very versatile, Solochana Ji a very felicitous birthday.#HappyBirthday #FilmCity pic.twitter.com/5XWDHv4cm0

— wearefilmcitymumbai (@wearefilmcity) July 30, 2021

 

 

 

 

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. सुमारे 6 दशके त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या निधनाने सकस व निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली, अशा शब्दात शरद पवारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी, नात- नातजावई असा परिवार आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली असल्याचे म्हटले जात आहे. सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी (ता. 5 जून) शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

 

● हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप

सुलोचना दीदी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली. एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती.

 

देव आनंद यांची भूमिका असलेल्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब. , वॉरंट आणि जोशिला आदी चित्रपटांचा समावेश आहे. राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमन, भोला भला यांचा समावेश आहे. त्याग , आशिक हूँ बहरों का आणि अधिकार आदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. तर, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा आदी चित्रपटांमध्ये त्यांनी सुनिल दत्त यांच्यासोबत भूमिका साकारली.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #Mother #Marathi #cinema #passedaway #worked #250films #Sulochnadidi #death, #मराठी #चित्रपटसृष्टी #आई #250हून #अधिक #चित्रपट #काम #सुलोचनादीदी #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शांत रहा… महापालिका खड्डयात झोपलीयं ! स्मार्ट सिटी की खड्ड्यांची सिटी, नागरिक वैतागले
Next Article किंमत नसणारे नेते नाना पटोलेंच्या गाडीत : चेतन नरोटेंचा रोख नेमका कोणाकडे ? तर्कवितर्क सुरू

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?