सोलापूर, 20 मे (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समांतर जलवाहिनीची चाचणी नियोजनाप्रमाणे यशस्वीरित्या झाली. त्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे आभार. या समांतर जलवाहिनीसाठी हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडून तत्कालीन मनपा आयुक्त शितल तेली – उगले यांच्या काळात ८९ कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून समांतर जलवाहिनीच्या पूर्णत्वासाठी मंत्रालयात विशेष बैठकही घेतली होती.
याचा पुढील टप्पा म्हणून शहरात अंतर्गत जलवितरण व्यवस्थेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर ८५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रकरिता वनविभागाची जागा मिळण्यासाठी शासनस्तरावर केलेले प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे यशस्वी झाले याचा आनंद आहे. मे महिन्यात समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करून चाचणी घेण्याचा शब्द पाळला आहे. आता जूनपासून आठवड्यातून दोनदा पाणी देण्याचा सोलापूरकरांना दिलेला शब्दही निश्चित पूर्ण करणार आहे.
—————