सोलापूर / मोहोळ : मोहोळ येथीलच लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंड्रस्ट्रीज कारखान्यात बायोडायजेस्टरच्या टाकी कोसळून फुटली. ही घटना आज रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर आठजण जखमी आहेत.
यात ज्योरीराम दादा वगरे (वय 45, राहणार बिटले, मोहोळ ) आणि सुरेश अंकुश चव्हाण (वय 22, रा. बिटले, मोहोळ) या दोन्ही कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सज्जन बाळू जोगदंड ( रा . बिटले ) , मंगेश नामदेव पाचपुंड ( रा . अनगर ) , महेश दिलीप बोडके ( रा . अनगर ) , कल्याण किसन गुंड ( रा . बिटले ) , परमेश्वर मधुकर थिटे ( रा . नालबंदवाडी ) , राजू दत्तात्रय गायकवाड ( रा . कुरणवाडी ) , रवींद्र गजेंद्र काकडे ( रा . अनगर ) , संजय बाजीराव पाचे ( रा . अनगर ) अशी जखमींची नावे आहेत .
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारखान्यात काम सुरू असताना अचानक पहाटे बायोडायजेस्टरची टाकी खाली कोसळली. त्यामुळे घटनास्थळावर काही कर्मचाऱ्यांनी धावाधाव केली. टाकी खाली कोसळल्यानंतर फुटली. टाकी फुटल्यानंतर मिथेन गॅस आणि द्रवरुप लिक्विड पदार्थ बाहेर पडला. त्यामुळे घटनास्थळावर वायू गळती झाली. यात काम करणारे 10 कर्मचारी सापडले. घटनास्थळावर दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले.
तर आठ कामगारांना सोलापूर सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहे.