Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लांबोटी नदीत रक्षा विसर्जनासाठी गेले असता आढळला महिलेचा मृतदेह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

लांबोटी नदीत रक्षा विसर्जनासाठी गेले असता आढळला महिलेचा मृतदेह

Surajya Digital
Last updated: 2022/11/17 at 9:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ : लांबोटी येथे आज गुरुवारी सकाळी एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडले असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला तिचा खून झाला की तिने आत्महत्या केली याबाबतउलट सुलट चर्चा सुरू आहे. Mohol found the dead body of a woman while going for Raksha immersion in Lamboti river

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दुधनीच्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी

 

या महिलेची ओळख पटवणे आणि याचा तपास करणे हे पोलीसासमोर आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज फिर्यादी रक्षा विसर्जनासाठी त्या ठिकाणी गेला असता यास सदर महिलेचा मृतदेह आढळून आला. सीना नदीपात्रामध्ये लांबोटी येथील जुन्या पुलाजवळ राख टाकून पाण्यामध्ये हात धुवत असताना एक प्रेत असल्याचे दिसून आले.

सदर प्रेत स्त्री जातीचे असून त्या मयत महिलेच्या अंगावर राखाडी रंगाचा स्वेटर, काळ्या रंगाचा टॉप व जांभळ्या रंगाचा पायजमा आहे. सदर महिला २५ ते ३० वयाच्या दरम्यान असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही. त्यामुळे तिची ओळख पटवण्यासाठी मोहोळ पोलिसांकडून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दुधनीच्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी

सोलापूर – लग्नाचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून महादेव श्रीमंत कांबळे (वय २५ रा.दुधनी, ता. अक्कलकोट) यांस १० वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.पी.आव्हाड यांनी ठोठावली.

 

गुन्ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी यातील आरोपीने २९ सप्टेंबर २०१८ रोजी यातील पिडीतेस लग्नाचे आमिष दाखवून सोलापुरातील कॉलेज परिसरातून पळवून नेले होते. त्यानंतर अहमदनगर, दौंड आणि दुधनी या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. दरम्यान इकडे पिडीता वस्तीगृहात हजर नसल्याचे वस्तीगृहाच्या अधिक्षीका यांनी त्याबाबत पिडीतेच्या आईला फोन करुन माहिती दिली होती.

 

आरोपी महादेव  कांबळे
आरोपी महादेव कांबळे

परंतु पिडीता आई वडीलांकडे गेली नसल्यााचे समजले. यापूर्वीही आरोपीने पिडीतेला पळवून नेल्याची माहिती पिडीतेच्या आईने त्यांना दिली. त्यानंतर वस्तीगृहाच्या अधिक्षीका यांनी जेलरोड पोलीसात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी या प्रकरणात महादेव कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक रोहित दिवसे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीता,फिर्यादी आणि डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली. समोर आलेला साक्षीपुरावा व सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीस १० वर्षाची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील रकमेपैकी ५ हजार रुपये नुकसान भरपाई पिडीतेला देण्याचे आदेशात नमुद आहे.

या खटल्यात सरकारच्या वतीने ॲड. एस.ए.डोके यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड .सतिश शेटटी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून .हे.कॉ. मैंदर्गी व म.पो.कॉ. जहागीरदार यांनी मदत केली .

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Mohol #found #deadbody #woman #going #Raksha #immersion #Lamboti #river, #लांबोटी #नदी #रक्षा #विसर्जन #आढळला #महिला #मृतदेह #कोर्टन्यूज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । पी. शिवशंकर यांच्या बदलीने कामगार संघटनेत आनंद, आणले फटाके
Next Article हे काम झाल्याचे समाधान, तर यांची खंत; आयुक्त पी. शिवशंकर यांनी व्यक्त केल्या भावना

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?