Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खासदार गिरीश बापट यांचे निधन, निधनाने NCP नेत्याला अश्रू अनावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

खासदार गिरीश बापट यांचे निधन, निधनाने NCP नेत्याला अश्रू अनावर

Surajya Digital
Last updated: 2023/03/29 at 2:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गिरीश बापट हे अनेक दिवसांपासून आजारी होते. बापट लाईफ सपोर्टवर असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. Death of MP Girish Bapat, death of NCP leader in tears in Pune Kasba

 

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते. त्यांचे इतर पक्षातील नेत्यांसोबतही चांगले संबंध होते. बापट यांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले. एक चांगला मित्र आज मी गमावला, असे काकडे यांनी म्हटले. दरम्यान पुणेकरांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होणारा नेता, अशी बापट यांची ओळख होती. बापट यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

BJP MP from Pune City, Girish Bapat has passed away in Deenanath Mangeshkar hospital, says Pune BJP president Jagdish Mulik. https://t.co/MWoiWxjqcL

— ANI (@ANI) March 29, 2023

 

‘पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. 4 दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत बापट यांनी सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी बापट यांना श्रद्धांजली वाहिली.

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट हे १.५ वर्ष रुग्णालयात दाखल होते, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यविधी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहेत. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर अशी ओळख असणारे गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.

 

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट यांनी 1995 मध्ये आमदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #Death #MP #GirishBapat #death #NCP #leader #tears #Pune #Kasba, #पुणे #खासदार #गिरीशबापट #निधन #राष्ट्रवादी #नेता #अश्रू #अनावर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कशासाठी ? ठाकरे सरकार पाडण्यासाठी, फडणवीसांसोबत दोन वर्षात दीडशे बैठका
Next Article नाशिकच्या सोनाराची 19 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरात एकास अटक

Latest News

भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित
देश - विदेश May 9, 2025
चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Top News May 9, 2025
थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?