Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ड्रग्ज प्रकरणी ओमराजेंनी सोडला विरोधकांच्या पायात साप; मग आता काय ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top Newsसोलापूर

ड्रग्ज प्रकरणी ओमराजेंनी सोडला विरोधकांच्या पायात साप; मग आता काय ?

admin
Last updated: 2025/04/12 at 2:06 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

प्रतिनिधी
तुळजापूर सोलापूर
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्‍या चर्चेमधील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झाले आहेत. राजकारण अन् ड्रग्ज बाजाराने राज्यात अद्यापही खळबळ कायमच असलेल्या तस्करी प्रकरणात निंबाळकरांनी वर्मावर घाव घातल्याचे मानले जात आहे.तस्करीत आढळलेल्यांना नेमके ‘अभय’ कोणाचे हाच त्यांचा उघड सवाल.खळबळजनक प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा अन् कुणाचा कार्यकर्ता कोणाचा? हे ओळखावं असं सांगत त्यांनी विरोधकांच्या पायात जणू साप सोडल्याची चर्चा तुळजापुरात रंगली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा गर्भित इशारादेखील ओमराजेंनी दिला आहे.

दरम्यान या प्रकरणामध्ये जे-जे कोणी अडकलेत त्यांना वाचवण्यासाठी कोणाचे अभय आहे, हे शोधणे गरजेचे आहे, या प्रकरणातील आरोपी हा कोणत्या पक्षाचा व कुणाचा कार्यकर्ता तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणातील दोषी माझ्या कितीही जवळचा असला तरी या प्रकरणात त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, या मताचा मी आहे.असंही त्यांनी म्हटलं आहे.

ओमराजे म्हणताहेत, दोषी कोणीही असु दे, करा अटक
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातील 21 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे ही पोलिसांपुढाचे आव्हान असणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. अद्याप काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणावरून भाजप व शिवसेना ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना खासदार ओमराजे यांनी मोठे वक्तव्य करीत केले असून आरोपी कोणी का असेना ? त्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी केली आहे.

…तर मी पाठिशी घातले असते का?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला वर्षभरापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी याबाबत माहिती मिळूनही कारवाई झाली नाही. माझा कार्यकर्ता असता तर मी पाठीशी घातले नसते, वर्षभरापूर्वीच हातोडा मारला असता. या प्रकरणातील आरोपी हा कोणत्या पक्षाचा व कुणाचा कार्यकर्ता आहे हे तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.माझ्या पक्षाचा अथवा माझ्या जवळचा कार्यकर्ता असता तर त्याचवेळी पोलिसांच्या स्वाधीन केले असते असेही त्यांनी स्पष्ट केले. जो पर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपी जेलमध्ये जात नाहीत, तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलय.

वादात आता काँग्रेसची उडी या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून व भाजपकडून एकमेकांवर आरोप केले जात असताना आता या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपीचे व भाजपच्या नेत्याचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व आरोपीना कधी अटक केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माढ्याच्या रुग्णालयात ‘असे’ काय घडले? सगळाच स्टाफ आला कारवाईच्या रडारवर
Next Article जञेत ‘तमाशा’ नव्हे नव्हे,पक्षाच्या मेळाव्यात झाला…पण कुठे आणि काय झालं?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?