कोलकाता , 4 एप्रिल (हिं.स.)।कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात हैदराबादचा दारूण पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघ अवघ्या १२० धावांमध्ये ऑलऑऊट झाला.या विजयासह कोलकाता संघाने पॉइंट्स टेबलवर भरारी घेतलीय. परंतु हैदराबादच्या पराभवाचा फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसलाय. या गुणतालिकेत मुंबई संघाचा क्रम घसरलाय.
आयपीएल २०२५ च्या पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झालाय. कोलकाता नाईट रायडर्सने केलेल्या मोठ्या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादच्या नेट रनरेटमध्ये लक्षणीय घसरण झालीय. परंतु ८० धावांनी हैदराबादचा पराभव करूनही केकेआरला अजूनही टॉप ४ मध्ये स्थान मिळवता आले नाहीये. दरम्यान आता १० संघांपैकी ५ संघांचे प्रत्येकी ४ पॉइंट्स आहेत, तर ५ संघांचे केवळ दोन पॉइंट्स आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाकडे सध्या दोन पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सह संघ सहाव्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ संघाकडे २ पॉइंट्स असून तो संघ सातव्या तर चेन्नई सुपर किंग्स २ पॉइंट्सह आठव्या क्रमांकावर आहे.
मुंबई इंडियन्सचा आज, शुक्रवारी लखनऊ सुपरजायंट्सशी सामना होणार आहे.या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांला ४ गुण मिळतील. इतकेच नाही तर मोठा विजय मिळवल्यास संघ टॉप ४ मध्येही आपले स्थान निश्चित करू शकतो. राजस्थान रॉयल्सनेदेखील आतापर्यंत फक्त एका सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे हा संघ ९व्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादकडे दोन गुण आहेत. तरीही संघ शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. संघाच्या नेट रन रेटमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता पुनरागमन करण्यासाठी या संघाला नुसता विजय मिळवून चालणार नाही तर त्याला मोठ्या विजयाची गरज असणार आहे.
—————