Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुरक्षा साहित्यविनाच सफाई कर्मचार्‍यांकडून होतेय ड्रेनेजची स्वच्छता, सांगा, मनपा का जीवावर उठतेयं !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सुरक्षा साहित्यविनाच सफाई कर्मचार्‍यांकडून होतेय ड्रेनेजची स्वच्छता, सांगा, मनपा का जीवावर उठतेयं !

Surajya Digital
Last updated: 2023/05/19 at 6:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

●  अधिकार्‍यांकडून उडवा उडवीची उत्तरे

 

सोलापूर :  महापालिका सफाई कर्मचार्‍यांकडून सुरक्षा साहित्यविना ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून स्वच्छतेचे काम  जीव धोक्यात घालून करण्यात येत आहेत. यामुळे सफाई कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिका वरिष्ठ अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या या जीवघेणी कामकाज पद्धतीबाबत संताप व्यक्त होत आहे. Drainage cleaning is being done by sanitation workers without safety materials, say, Why is the municipal corporation coming to life, Solapur Municipal Corporation

गुरुवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास पाणीवेस तालीम ते लक्ष्मी भाजी मंडई या मार्गावर जवळपास दहा ते बारा फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून दोन कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे कोणतेही सुरक्षा साहित्य नव्हते. ही गंभीर बाब आहे. यापूर्वी झालेल्या सफाई कर्मचार्‍यांच्या मृत्यूच्या घटनांमधून महापालिकेने कोणताही धडा  घेतला नाही.

दरम्यान, या सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य का दिले नाही ? यासंदर्भात विचारणा केले असता तेथील निगराणी करणार्‍या अधिकार्‍याने उडवा उडवीची उत्तरे दिली.   दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार हे नामानिराळे राहत असून यात मात्र पोटाची खळगी भरणार्‍या कर्मचार्‍यांचा बळी जातो. वारंवार घडणार्‍या अशा घटना रोखण्यासाठी महापालिका ठोस कार्यवाही करताना दिसून येत नाही.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

●    यापूर्वी घडल्या होत्या दुर्घटना

यापूर्वी सोलापूर शहरात ड्रेनेजमध्ये उतरून काम करीत असताना गुदमरून सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी मानल्या जाणार्‍या सोलापूर शहरात महापालिकेचे सफाई कामगार सुरक्षा साहित्याविना काम करत असल्याचे दिसून येत आहे. सफाई कर्मचारी महापालिकेचे असो अथवा कंत्राट पद्धतीवर असो त्यांना नियमानुसार सुरक्षा साहित्य देण्याची आवश्यकता आहे.
●  अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची गरज

सफाई कामगार कामावर असताना सुरक्षा साहित्य वापरतो की नाही ? या कामगारांना ऑक्सिजन मास्क, हँडग्लोज यासह इतर सुरक्षा साहित्य देण्यात आले की नाही ? याकडे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, सार्वजनिक आरोग्य  कार्यकारी अभियंता यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष करणार्‍या बेजबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
●  चौकशी करून खबरदारी घेण्यास सांगू : आयुक्त

सुरक्षा साहित्याशिवाय ड्रेनेजमध्ये काम करणे चुकीचे आहे. संबंधित झोन अधिकार्‍याची  चौकशी करून त्यांना  सफाई कर्मचार्‍यांची खबरदारी घेण्यास सांगू, असे पालिका आयुक्त शितल तेली उगले म्हणाल्या.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Drainage #cleaning #being #done #sanitation #workers #without #safety #materials #say #municipal #corporation #coming #life #Solapur #Municipal #Corporation, #सुरक्षा #साहित्यविना #सफाई #कर्मचारी #ड्रेनेज #स्वच्छता #सांगा #मनपा #जीवावर #सोलापूर #महानगरपालिका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्रीकांत देशमुखांवर पत्नीचा दावा करणाऱ्या, ‘त्या’ महिलेचा सांगोल्यात पुन्हा आक्रोश
Next Article नोटबंदी : 2 हजाराची नोट बंद होणार; या तारखेपर्यंत बँकेत जमा करा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?