Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाच खून करुन फरार असलेल्या आरोपीला वीस वर्षानंतर अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पाच खून करुन फरार असलेल्या आरोपीला वीस वर्षानंतर अटक

Surajya Digital
Last updated: 2023/06/06 at 11:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 सोलापुरातील दोन अपहृत अल्पवयीन मुली नवी मुंबईतून ताब्यात

● सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी

 

सोलापूर – अक्कलकोट (दक्षिण पोलीस ठाणे ) येथे दाखल असलेल्या २ महिला आणि ३ मुले अशा ५ जणांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर फरार झालेल्या जाफर बाळू पवार (वय ६० रा. सिद्धापूर ता. मंगळवेढा ) या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल २० वर्षानंतर नुकतीच अटक केली. Accused who was absconding after committing five murders arrested after 20 years Court News Akkalkot Solapur Life imprisonment Human transport cell

पाच जणांचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायालयाने जाफर बाळू पवार (रा. सिद्धापूर ) याला १५ डिसेंबर १९९४ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात (मुंबई ) अपिल दाखल केले होते. सदरचे अपील उच्च न्यायालयाने १८ मे २००५ रोजी फेटाळले होते . असुन तेव्हा पासुन आरोपी मिळुन येत नव्हता.

 

सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपी यास पकडणे बाबत स्थायी वॉरंट काढले होते. नमुद गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सदर स्थायी वॉरंट बजावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.

सदर आरोपी हा रेकॉर्ड असुन त्याचे विरुध्द खुन, दरोडा, खुनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणुक सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथील पाच जणाच्या खुनांच्या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावलेली आजन्म कारावासाची शिक्षा टाळण्याकरीता आरोपी हा मागील 20 वर्षा पासुन त्याचे अस्तित्व लपविण्याकरीता वेगवेगळया ठिकाणी राहत होता.

स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. निरीक्षक धनंजय पोरे व फौजदार सुबोध जमदाडे यांचे पथकाने आरोपी याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त केली. आणि त्याला काल ५ जून रोजी सिध्दापूर (ता.मंगळवेढा ) येथे सापळा रचुन अटक केली .

अटकेतील जाफर पवार या आरोपीला सत्रन्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस आजन्म कारवासाची शिक्षा भोगण्याकरीता कारागृहात रवानगी केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 सोलापुरातील दोन अपहृत अल्पवयीन मुली नवी मुंबईतून ताब्यात

● ग्रामीणच्या मानवी वाहतूक कक्षाची कारवाई

सोलापूर : टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींना ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.

 

मागील वर्षी टेंभुर्णी हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. त्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हा दाखल झालेल्या तारखेपासून पीडित मुलींचा टेंभुर्णी पोलीस ठाण्याने शोध घेऊनही त्या सापडल्या नव्हत्या. त्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.

याचा तपास या कक्षाने करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरुन तसेच सायबर सेलच्या मदतीने दोन्ही पीडित मुलींना घनसोली, नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

ही कारवाई या कक्षाचे पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, पोलीस अंमलदार मंजुळा धोत्रे, सविता कोकणे, सूर्यकांत जाधव, सचिन वाकडे लक्ष्मण राठोड, प्रिती पाटील, प्रियंका सर्वगोड, तसेच सायबरचे व्यंकटेश मोरे यांनी केली.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Accused #absconding #committing #fivemurders #arrested #20years #CourtNews #Akkalkot #Solapur #Lifeimprisonment #Humantransportcell, #पाच #खून #फरार #आरोपी #वीसवर्षानंतर #अटक #सोलापूर #अल्पवयीन #नवीमुंबई #जन्मठेप #अक्कलकोट #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी आमदार रमेश कदमांना 6 वर्षानंतर जामीन मंजूर
Next Article सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ‘चिमणी’ बाबत नियोजन भवनात गोपनीय बैठक ?

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?