Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अल्पवयीन मुलीकडे बघून अश्लील हावभाव, आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी शिक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

अल्पवयीन मुलीकडे बघून अश्लील हावभाव, आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी शिक्षा

Surajya Digital
Last updated: 2021/04/02 at 12:48 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : अल्पवयीन मुलगी घराकडे जाताना आरोपीने तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केले. त्यानंतर तिच्याकडे ‘आय लव्ह यु’ तसेच हिंदी शायरी व त्याखाली मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी फेकली. ही घटना पुण्याच्या मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे 25 डिसेंबर 2018 ला घडली होती. या प्रकरणी आरोपी तरुणाला जिल्हा न्यायालयाने 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अरुणकुमार भगत (22) असं आरोपीचं नाव आहे.

प्रेम व्यक्त करणारा संदेश आणि शायरी लिहिलेली असलेली चिठ्ठी अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणा-या तरुणास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अरुणकुमार भगत (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे हा प्रकार घडला होता. घटनेच्या दिवशी पिडीता घराकडे येत असताना आरोपीने तिच्याकडे बघून अश्लील वक्तव्य केले.

त्यानंतर तिच्या दिशेने ‘आय लव यू’ तसेच हिंदी शायरी व त्याखाली मोबाईलनंबर असलेली चिठ्ठी फेकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीतेची साक्ष तसेच त्यास पृष्टी देणारी आरोपीने फेकलेली चिठ्ठी महत्त्वाची ठरली. तो पुरावा ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. तळेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुंदा गावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना पोलिस हवालदार नितीन पवार यांनी मदत केली.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #Obscene #gestures #minorgirl #accused #sentenced #3years #hardlabor, #अल्पवयीन #मुलीकडे #बघून #अश्लील #हावभाव #आरोपीला #3वर्षे #सक्तमजुरी #शिक्षा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शाळेत बसवली कंडोम वेंडिंग मशीन, यासाठी सरकार पूरवते निधी
Next Article एटीएम कार्डची गरज नाही, मोबाईलद्वारेच काढता येणार पैसै

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?