Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान हुतात्मा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान हुतात्मा

admin
Last updated: 2025/04/12 at 3:07 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

फ्लॅग मिटींगनंतर लगेच शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू, 12 एप्रिल (हिं.स.) : भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या फ्लॅग मिटींगनंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत शुक्रवारी रात्री अखनूरच्या केरी बट्टल परिसरात गोळीबार केला. भारतात घुसखोरी करवण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या या गोळीबारात भारताचा एक जवान हुतात्मा झाला. दरम्यान भारताकडूनही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याचेही सांगितले जात आहे. तिथे दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्याच वेळी, पूंछमधील फ्लॅग मिटींगच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा, सीमेपलीकडून हल्ला करण्यात आला. भारतीय लष्कराचे जवान पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.

यासंदर्भात लष्कराने सांगितले की, अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी शहीद झाला आहे. पण त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. केरी भट्टल परिसरातील जंगलातील एका नाल्याजवळ शुक्रवारी रात्री उशिरा जिहादी दहशतवाद्यांच्या हालचाली सतर्क सैन्य दलाच्या जवानांना दिसल्या. त्यानंतर जोरदार गोळीबार झाला जो बराच वेळ चालू राहिला. या चकमकीत एक जेसीओ जखमी झाला आणि नंतर त्यांचे बलिदान झाले. या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी याच परिसरात जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एका कॅप्टनसह दोन जवान हुतात्मा झाले होते.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘एचव्हीपीएम’चे क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू – क्रीडामंत्री भरणे
Next Article नॅशनल हेरॉल्ड : ईडीने सुरू केली मालमत्ता जप्तीची प्रक्रिया

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?