Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानी अभिनेत्रींची भारतावर आगपाखड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानी अभिनेत्रींची भारतावर आगपाखड

admin
Last updated: 2025/05/07 at 4:28 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई , 7 मे (हिं.स.)। पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांच्या ९ तळांना उद्धवस्त केले. या एअर स्ट्राईकमध्ये १०० हून जास्त दहशतवादी ठार झाले, असं सांगण्यात येतं.भारतातील तमाम नागरीकांनी या एअर स्ट्राईकचं कौतुक करुन भारतीय सेनेचं अभिनंदन केलंय. पण या हल्ल्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्रीने भारताला दोष देऊन या हल्ल्याबद्दल पोस्ट लिहिली आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. हानियाने लिहिलंय की, “मी कोणत्याही पाकिस्तानी माणसाला पहलगाम हल्ल्याचा जल्लोष करताना पाहिलं नाही. परंतु असंख्य भारतीय या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निर्दोष लोकांच्या हत्येचा आनंद साजरा करत होते. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, चीड आणि दुखावलं गेलेलं मन आहे. एक मुलगा जग सोडून गेला. त्याचं कुटुंब उध्वस्त झालं. हे कशासाठी?” “तुम्ही या पद्धतीने कोणाची सुरक्षा नाही करु शकत.

ही एक प्रकारची क्रूरता आहे. निर्दोष लोकांवर बाँब हल्ला करुन तुम्ही याला स्ट्रॅटेजी म्हणू शकत नाही. ही ताकद नाही तर भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला बघतोय.” हानिया आमिरनंतर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने सुद्धा तिचा राग व्यक्त केला आहे. माहिरा म्हणाली की, “हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. अल्लाह आमच्या देशाची सुरक्षा करेन. सद्बुद्धी येवो. आमीन.” असे तिने आपल्या संदेशात नमूद केले आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल
Next Article पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा रद्द

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?