Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाल किल्ल्यावर दावा करणारी याचिका फेटाळली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

लाल किल्ल्यावर दावा करणारी याचिका फेटाळली

admin
Last updated: 2025/05/05 at 5:37 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुघल घराण्यातील महिलेची सुप्रीम कोर्टात मागणी

नवी दिल्ली, 05 मे (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील एका महिलेने दिल्लीच्या लाल किल्ल्याचा ताबा देण्यात यावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. संबंधित याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ही याचिका फेटाळताना “फक्त लाल किल्लाच का, फतेहपूर सिक्री का नाही, त्याला का वगळले ? अशा शब्दात खडसावत सरन्‍यायमूर्ती संजीव खन्‍ना आणि न्या. पी.व्ही. संजय कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

इंग्रजांच्या राजवटीत 1857 साली झालेल्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ब्रिटिशांनी मुघलांकडून लाल किल्ला ताब्यात घेतला होता. तसेच तत्कालिन मुघल शासक बहादूर शाह जफर यांना देशाबाहेर काढून त्याची जमीन आणि मालमत्ता जप्त करण्यात आली होती. आपण अखेरचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचे थेट वंशज आहोत. त्‍यामुळे लाल किल्‍लावर आपला मालकी हक्‍का आहे. सरकारने आपल्‍या लाल किल्‍ला देणार नसेल पैसे द्‍यावेत, अशी मागणी करणारी याचिका कोलकाता येथील रहिवासी सुलताना बेगम यांनी केली होती. सुलताना बेगम यांनी 2021 मध्‍येही दिल्ली उच्च न्यायालयातही अर्ज दाखल केला होता. केंद्र सरकारने त्यांचे मृत पती बेदर बख्त यांचा दावा 1960 साली स्वीकारला होता.

बेदर बख्त हा बहादूरशाह जफर यांचे वारसदार होते. सरकारने त्यांना पेन्शन देण्यास सुरुवात केली. परंतु, 1980 मध्ये त्यांच्या निधनानंतर, सुलताना बेगम यांनाही पेन्शन मिळू लागली. मात्र पेन्शन त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही. सरकारने लाल किल्ला ‘बेकायदेशीरपणे’ ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मूलभूत अधिकारांचे आणि संविधानाच्या कलम 300-अ चे उल्लंघन आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर 3 वर्षांनी त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. परंतु, लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्रीच का नाही? त्यांनाही का वगळले?, असे स्‍पष्‍ट करत सुलताना बेगम यांची लाल किल्‍यावर हक्‍क सांगणारी याचिका पूर्णपणे चुकीची आहे. आम्‍ही ती फेटाळून लावत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खलिस्तानी दहशतवाद्यांची हिंदू समुदायाला कॅनडा सोडण्यासाठी धमकी
Next Article कोल्हापूरसाठी निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री शिंदे

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?