Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राकेश रोशनवर गोळ्या झाडणा-याला पुन्हा अटक; पॅरोलवरून झाला होता फरार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीHot Newsटॉलीवुड

राकेश रोशनवर गोळ्या झाडणा-याला पुन्हा अटक; पॅरोलवरून झाला होता फरार

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 10:38 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर साल २००० मध्ये झालेल्या हल्ल्यात सहभागी गुन्हेगार आणि शार्पशूटरला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. हा गुन्हेगार तीन महिन्यांपूर्वी पॅरोलवरून फरार झाला होता. सुनील गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून कळवा येथील प्रशिक सर्कल भागातून शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीविरूद्ध ११ खुनाची प्रकरणंं आणि ७ खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी एक प्रकरण म्हणजे दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर २००० मध्ये करण्यात आलेला प्राणघातक हल्ला. जानेवारीमध्ये, मुंबईच्या सांताक्रूझ येथील राकेश यांच्या ऑफिसच्या बाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर पोलिसांनी सुनील गायकवाडला अटक केली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका खून प्रकरणात गायकवाडला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आलं. २६ जून रोजी २८ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल संपल्यानंतर तो तुरुगांत परत न येता फरार झाला. बराच शोध घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हा १९९९- २००० या वर्षात अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. तो अली बुदेश आणि सुभाषसिंग ठाकूर यांच्या टोळीचा सदस्य आहे. सुनील गायकवाडचा नाशिक दरोड्यातही हात आहे. पोलीस लवकरच सुनीलला पंत नगर पोलिसांच्या स्वाधीन करतील, त्यानंतर त्याला तुरूंगात पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #राकेशरोशन #गोळी #अटक #पॕरोलवर #फरार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खूशखबर ! EPFO चे दिवाळी भेट, व्याजाचा पहिला हफ्ता दिवाळीपर्यंत मिळणार
Next Article बालसाहित्यिक निर्मला मठपती यांचे निधन; आज झाले अंत्यसंस्कार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?