Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचे संदर्भ हटवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचे संदर्भ हटवले

admin
Last updated: 2025/04/28 at 2:41 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.) : एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व संदर्भ हटवण्यात आले आहेत.

याबाबत एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकाशित झालेले पुस्तक- ‘एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियाँड’ हे सुधारित अभ्यासक्रमाचा केवळ पहिला भाग आहे. तर दुसरा भाग आगामी महिन्यांत प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे. मात्र, वगळलेला मजकूर दुसऱ्या भागात समाविष्ट केला जाईल का, यावर अद्याप कोणतीही टिप्पणी केलेली नाही. सातवीच्या नवीन एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व उल्लेख काढून टाकण्यात आले आहेत. याऐवजी, भारतीय राजवंशांवरील प्रकरणे, ‘पवित्र भूगोल’ आणि इतर अनेक संदर्भ जोडले गेले आहेत. यामध्ये प्रयागराजचा महाकुंभमेळा आणि मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ, अटल बोगदा (टनल) सारख्या सरकारी योजनांचा नवीन इयत्ता सातवी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या आठवड्यात प्रकाशित झालेली ही पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क 2023 च्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहेत.

“एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड” या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर नवीन प्रकरणे आहेत, ज्यात “भारतीय नीतिमत्ता”वर लक्ष केंद्रित केले आहे. पुस्तकात आणखी एक नवीन भर म्हणजे “जमीन कशी पवित्र होते” हे प्रकरण आहे जे भारतात आणि बाहेर इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी आणि झोरोस्ट्रियन, हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म यासारख्या धर्मांसाठी पवित्र मानली जाणारी ठिकाणे आणि तीर्थस्थळांवर लक्ष केंद्रित करते. या प्रकरणात “पवित्र भूगोल” सारख्या संकल्पनांचा परिचय करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगे, 4 धाम यात्रा आणि “शक्तीपीठे” सारख्या ठिकाणांच्या जाळ्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. या प्रकरणात नद्यांचे संगम, पर्वत आणि जंगले यासारख्या पूजनीय ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानच्या १६ युट्युब चॅनेल्सवर भारतात बंदी
Next Article विराट कोहली-केएल राहुल भर सामन्यात भिडले

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?