Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । डॉ. असद मुंशी आत्महत्या प्रकरणी पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । डॉ. असद मुंशी आत्महत्या प्रकरणी पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/12/18 at 9:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

सोलापूर : सोलापूर शहरातील नावाजलेले तरूण डॉक्टर असद मुन्शी यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आता यात पत्नी, मेहुण्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. Solapur. Dr. Case registered against 5 persons including wife in Asad Munshi suicide case

आत्महत्येस कारणीभूत धरत मयताच्या पत्नी, मेव्हणा, सासऱ्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अहमद शाहनवाज मुन्शी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. मुंशी यांनी स्वतःला इंजेक्शन देऊन त्यांनी आपले जीवन यात्रा संपवली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याची माहिती समोर आली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉक्टर असद मूंशी यांची पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, सरफराज नजीरअहमद सय्यद, नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद, सर्व राहणार मोहिते नगर, शगुन अपार्टमेंट होटगी रोड सोलापूर व डॉक्टर मिलिंद सरोदे (रा. जळगाव) यांचा समावेश आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

फिर्यादीत म्हटले आहे की, सर्वांनी संगनमत करून फिर्यादीचे भाऊ मयत डॉक्टर असद मुंशी यांना मानसिक त्रास देऊन तसेच डॉक्टर मुंशी हे त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गेले असता त्यावेळेस मुलीला पाहू न दिल्याने डॉक्टर असद मुंशी यांना मानसिक त्रास झाला. त्यामुळे ते आत्महत्येस प्रवृत्त व्हावे म्हणून त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला गेला व तसेच डॉक्टर मिलिंद सरोदे यांनी देखील फिर्यादी यांचा भाऊ असद मुंशी यांना फोनवर फलकनाज हिच्यासोबत माझे प्रेम संबंध आहेत असे बोलून मानसिक खच्चीकरण केले होते.

या सर्वाच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचा भाऊ असद मुन्शी यांनी दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.

परिवाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक विडिओ देखील रेकॉर्ड केला होता. डॉ. असद मुन्शी यांचे बंधू अहमद मुन्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून मृत डॉ. मुन्शी यांच्या पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, मेहुणा डॉ. सरफराज नजीरअहमद सय्यद, सासरे नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद आणि डॉ. मिलिंद सरोदे यांच्यावर भांदवि 306, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Solapur #Doctor #Case #registered #persons #wife #AsadMunshi #suicidecase, #सोलापूर #डॉअसदमुंशी #आत्महत्या #प्रकरणी #पत्नी #मेहुणा #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Maharashtra Police Bharti : पोलीस भरती – 18 हजार जागांसाठी 18 लाख अर्ज; 2 जानेवारीपासून मैदानी चाचणी, पण विशेष सूचना…
Next Article अक्कलकोट : 20 ग्रामपंचायतीसाठी 79.30 टक्के मतदान, मंगळवारी निकाल

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?