Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खंडणी नेटवर्क मजबूत करण्यासाठी सलमानच्या घरी गोळीबार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

खंडणी नेटवर्क मजबूत करण्यासाठी सलमानच्या घरी गोळीबार

admin
Last updated: 2024/07/09 at 4:42 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 9 जुलै (हिं.स.) : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.या गोळीबार प्रकरणानंतर महाराष्ट्रात खंडणीच नेटवर्क मजबूत करण्याचा बिश्नोई गँगचा प्रयत्न होता. मुंबई पोलिसांनी सतराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये अनमोल बिष्णोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या सगळ्या आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सोमवारी सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले.मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, राज्यात बिष्णोई गँगला खंडणीच रॅकेट वाढवायचे होते. खंडणी उकळण्याच्या उद्देशानेच बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

बिश्नोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसह पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देऊन त्याच्या घरावरती गोळीबार करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले. सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातही खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न दिसतोय असाच जबाब दिला आहे. बिश्नोई गँगच्या या कृत्यांमुळे मी आणि माझे कुटुंब भीतीच्या वातावरणाखाली जगत आहोत असेही सलमानने मुंबई पोलिसांना जबाब सांगितले.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

दुप्पट नोटा देतो म्हणून १० लाखास गंडवले ; कोणाला, कसं अन् कुठे ?

जळगाव : दारूच्या नशेत पतीनेच केली पत्नीची हत्या

महूदला कोयत्याने वार… मग पुढे ‘हे’ झाल खरतनाक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचे रॅकेट-आ. प्रविण दरेकर
Next Article मानवी अवयव प्रत्यारोपण प्रकरणी 7 जणांना अटक

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?