Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टेंभुर्णीजवळ वाळू माफियाकडून पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

टेंभुर्णीजवळ वाळू माफियाकडून पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2021/08/26 at 9:17 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

टेंभुर्णी : भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या ट्रक्टरला थांबायला सांगणा-या पोलीस कर्मचा-यालाच धडक देऊन ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रकार मंगळवारी (ता. २४) मध्यरात्री १२.०५ वाजण्याचा सुमारास घडला. हा प्रकार टाकळी (ता. माढा) येथे घडला असून याप्रकरणी ट्रॕक्टर चालक, मालकासह तिघांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चालकाला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात मोटारसायकलसह एका बोलेरो जीपचे नुकसान झाले आहे. सुधीर सोरटे या चालकाला ताब्यात घेतले असून महादेव लक्ष्मण शेळके, समाधान जरक ( सर्व रा. टाकळी ता. माढा ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मंगळवार दि. २४ रोजी भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जात असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम शिवाजी माने-देशमुख व घाडगे हे कारवाई करण्याकरिता गेले. मध्यरात्री १२ वाजण्याचा सुमारास ट्रॕक्टर क्रमांक एम. एच. ४३ क्यु ३३९४ चालक सुधीर सोरटे थांबवून ट्रॕक्टर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी घ्यायला सांगितले असता ट्रक्टरमध्ये बसलेले सुधीर सोरटे यांनी हातात टॉमी घेऊन पोलीसांच्या अंगावर धावून आला व धक्काबुक्की करू लागला.

ट्रॕक्टर मालक समाधान जरक याने ट्रॕक्टर चालकास ट्रॕक्टर पोलिसांचे अंगावर घालण्यास सांगितले. चालकानेही ट्रॕक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस कर्मचारी यांनी बाजूला उड्या मारल्याने बचावले. ट्रॕक्टर मोटार सायकल क्रमांक एम. एच. ४५ एम. ७२७० या गाडीलवरून घातल्याने मोटारसायकलचे नुकसान झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गावातील बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो गाडी क्रमांक एम. एच. २१ व्ही. ९३६३ गाडीला धडक देऊन गाडीचे नुकसान केले. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने-देशमुख यांना किरकोळ मार लागला आहे. पोलीसांच्या अंगावर ट्रॕक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या तीघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कलम 307,353,332,379,188,427,34, पर्यावरण कायदा कलम 9,15 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अवैधरित्या धंदे करणाऱ्यावर मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याच इशारा नुतन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे.

*  तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : सैफुल परिसरातील रोहिणी नगरात राहणाऱ्या राजाराम शिवाजी चौधरी (वय २२) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना  बुधवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास घडली. राजाराम चौधरी याने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून वडिलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार वाल्मिकी पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Attempt #crush #police #sandmafia #Tembhurni #tractor, #टेंभुर्णी #वाळूमाफिया #पोलीसाला #ट्रॅक्टरने #चिरडण्याचा #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘पवारसाहेब, ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा सुसंस्कृतपणा बघा’, दिशा सालियान केस पुन्हा चर्चेत; मंत्री जेलमध्ये जाणार ?
Next Article नान्नजमध्ये विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?