Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात सावकारांचा भडका; आणखीन तीन सावकारांवर गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

सोलापूर शहरात सावकारांचा भडका; आणखीन तीन सावकारांवर गुन्हे दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 9:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : शहरात खासगी अवैध सावकारी जोरात सुरू आहे. अनेक गोरगरिब लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना अव्वाच्या – सव्वा व्याज दराने कर्ज देऊन मालमत्ता ताब्यात घेऊन ठार मारण्याची धमकीही दिली जात आहे. सोलापूर शहरात आणखीन तीन सावकाराविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन गायकवाड (रा.मेहता टॉवर, बुधवार पेठ,सोलापूर), गुड्डू तळभंडारे (रा.हनुमान नगर बस डेपो जवळ,भवानी पेठ,सोलापूर) , राजू कापसे (रा.प्रभाकर वस्ती,सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तीन सावकारांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी किशोर देविदास जाधव (वय-३४, रा.प्लॉट नंबर २५ गणेश नगर,मडकी वस्ती, सोलापूर) यांनी सचिन गायकवाड याच्याकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते व ८० हजार रुपयेच्या प्रतिदिनप्रमाणे आठशे रुपये रोखीने व्याज देणे असे ठरले होते.

त्यानंतर फिर्यादीने दोन टप्प्यात ऑक्टोबर २०१९ ते १ जानेवारी २०२० या दरम्यान दोन लाख २२ हजार रुपये व एक लाख ४२ हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण तीन लाख ६४ हजार रुपये सावकार सचिन गायकवाड याला परत दिले. मात्र गायकवाड याने फिर्यादी जाधव याला आणखीन ४० हजार रुपये येणे आहेत ते मला परत दे अथवा तुझी कॅन्टींग माझ्या नावावर करून दे, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सावकार गुड्डू तळभंडारे याच्याकडून नोव्हेंबर २०१९ मध्ये वीस हजार रुपये घेऊन दर आठवड्याला ४ हजार रुपये व्याज घेतले होते. मात्र तळभंडारे यास फिर्यादीने चार महिने आठवड्याला ४ हजार रुपये प्रमाणे ६४ हजार रुपये व्याज दिलेले असतानादेखील तळभंडारेने फिर्यादीकडे आणखीन २६ हजार रुपयांची मागणी करून फिर्यादीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या कॅंटीनचे वस्तू आणण्यासाठी कुंभार वेस येथे गेले असता तळभंडारे व राजू कापसे याने कुंभार वेस येथून फिर्यादीस जबरदस्तीने जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या शर्टाच्या गच्चीला धरून बुलेटवर बसवून पैसे वसुली करिता फिर्यादीस घेऊन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना २० मार्च रोजी कमल हॉटेल जवळ घडली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #सोलापूर #सावकार #अटक #फौजदारचावडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांतसिंह प्रकरणात खासदार सुजय विखेंचा सबुरीचा सल्ला; तपास सीबीआयकडे गेलाय
Next Article पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखाच्या वर; ३ हजारांहून अधिक कोरोनाबळी

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?