हतीद-सांगोल्याला नवर्याचा सख्खा मामाच निघाला ‘वासनांध’
लफड्याच्या छळवादाला कंटाळून श्रावणीने संपविले अखेर जीवन
: अवघ्या सहा महिन्याचा मुलीला सोडून तिनं केली आत्महत्या
: सांगोल्या तालुक्यातील हतीदमधील ह्दयदावक घटना
: हतीदसह तालुक्यात हळहळ
: नवरा, आजी, दोघे मामा असे घरातल्या सगळ्यांना जेलची हवा
खास प्रतिनिधी
सांगोला सोलापूर : सांगोला तालुक्यातील हातीद येथे दोनच वर्षापूर्वी लग्न झालेल्या आणि अवघी सहा महिन्याची मुलगी असलेल्या श्रावणी अनिकेत मंडल (वय 23) या विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवरा अनिकेत याचा सख्खा मामा नेताची चव्हाण हा शरिराशी लगट करायचा, छेडछाड करायचा, शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायचा, त्याचबरोबरच नवर्यासह घरातील आज्जेसासू आंबुताई चव्हाण, नवर्याचा दुसरा मामा सोमा चव्हाण यांच्याकडून शिवीगाळ, मारहाण असा छळवाद सुरु होता. त्यास कंटाळून श्रावणी हिने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.
दरम्यान याप्रकरणी विवाहित श्रावणी हिची आई मनिषा चव्हाण ( वय 40 रा.मणेराजुरी ता. तासगाव जि. सांगली) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून श्रावणी हिच्या आत्महत्येशी जबाबदार असल्याच्या कारणावरुन पती अनिकेत मंडले, आज्जेसासू आंबुताई चव्हाण, नवर्याचे मामा सोमा चव्हाण आणि नेताजी चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सांगोला तालुक्यातील हतीद येथील अनिकेत याच्यासोबत श्रावणी हिचा विवाह जून 2023 मध्ये झाला होता. दोन-तीन महिने तिला चांगले नांदविल्यानंतर तिचा घरातील सगळ्या सदस्यांनी मानसिक, शारिरीक छळ सुरु केला. शिवाय नवर्याचा मामा नेताजी चव्हाण हा श्रावणी हिला शारिरीक संबंध ठेव म्हणून छेडछाड करीत होता, लगट करीत होता, असे मृत श्रावणी हिची आई मनिषा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सगळ्याचा संशयितांना अटक करण्यात आली असून सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पुजारी हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
अवघ्या दोनच वर्षात संपला संसार…
मृत श्रावणी हिचा अनिकेत मंडले याच्यासोबत जून 2023 मध्ये विवाह झाल्या होता. तद्नंतर दोन वर्षातच होणार्या छळवादातून श्रावणीला या जगाचा कायमचा निरोप घ्यावा लागला. अनिकेत हाच पती म्हणून जन्मोजन्मी सात जन्मी राहावा अशी मनिषा श्रावणी हिनं आपल्या मनाषी लग्नानंतर काही सुखाच्या दिवसात बाळगली होती. मात्र, पुढे तिचा छळवाद सुरु झाला. अवघा दोन वर्षे तिने कसाबसा संसार केला.‘भातकुलीच्या खेळामधली राजा अन् एक राणी…अर्ध्यावरती डाव मोडिला अधूरी एक कहाणी’ या गाण्याचा प्रत्यय श्रावणीच्या आत्महत्येमधून आला.
अवघ्या सहा महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी
मृत श्रावणी हिला सहा महिन्याची मुलगी आहे. ती अजून श्रावणीचं दूध पित होती. तिला अजून आई-वडिलांचीसुद्धा चांगली ओळख व्हायची होती, तोपर्यंच होणार्या असह्य छळाला कंटाळून श्रावणी हिनं आत्महत्या केली. ती या जगाला कायमचं सोडून जाताना सहा महिन्याच्या पोटच्या गोळाल्यासुद्धा सोडून गेली. सहा महिन्याची चिमुरडी आईविना कायमची पोरकी झाली. याबद्दल हतीद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रावणीचा सोन्याचा संसार अवघ्या तीन महिन्यांचा
चांगला संसार करायचा अशी मनीषा बाळगुन असलेल्या श्रावणीला तिच्या सासरच्यांनी अवघे तीन महिने चांगले वागवले. मात्र तद्नंतर तिचा कायम छळवाद केला. सोन्यासारखा संसार तिच्या नशिबी अवघा तीन महिने राहिला.
सांगोला : आठवणीचे क्षण म्हणून श्रावणी मंडले हिने जिवंतपणी मोठ्या हौसेने चिमुरडी लेकीला घेऊन असा सुंदर फोटो काढला होता. हा फोटो केवळ आता आठवण म्हणूनच राहिला.