लातूर, 15 ऑक्टोबर। लातूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी 25 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर करण्यात आला आहे.
सामाजिक बांधिलकीचा आदर्श घेऊन, लातूरचे ग्रामदैवत मानले जाणारे श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानतर्फे ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. सदर निधीचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांच्याकडे देवस्थानचे जेष्ठ विश्वस्त तसेच माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
ही मोलादी देणगी देवस्थानाच्या सामाजिक जबाबदारीच्या भावनेचे प्रतीक आहे, ज्यामुळे अतिवृष्टीने ग्रासलेल्या कुटुंबांना ऊर्जितावस्था आणण्यास मदत होईल.