Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात दोन चोरट्यांना अटक; ११ गुन्हे उघडकीस; बार्शीत 48 तासांत दुकान फोडणारे चार आरोपी पकडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात दोन चोरट्यांना अटक; ११ गुन्हे उघडकीस; बार्शीत 48 तासांत दुकान फोडणारे चार आरोपी पकडले

Surajya Digital
Last updated: 2021/08/30 at 9:35 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहर परिसरात घरफोडी आणि दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून ८ घरफोडीचे तर ३ दुचाकी चोरीचे असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले. त्या सर्व गुन्ह्यातील दागिन्यासह २ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .

त्यापैकी पहिल्या आरोपीचे नाव सचिन इरप्पा धोत्रे (वय२० रा. केकडे नगर, एमआयडीसी, सोलापूर) असे आहे. त्याच्या ताब्यातून ९५ हजार रुपये किमतीचे २६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धोत्रे आणि त्याच्या सहकाऱ्या ने मिळून जून ते जुलै महिन्यात तीन घरफोड्या केल्या. तर लांबोटी येथील ढाब्या समोरून २ तर शेळगी परिसरातून एक असे ३ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने अटक करून गुन्हे उघडकीस आणले.

तर दुसऱ्या आरोपीचे नाव शशिकांत उर्फ पिल्ल्या अनिल राक्षे (वय ४३ रा.तांब्री, सम्राट चौक, उस्मानाबाद) असे आहे. याला गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक निखिल पवार यांच्या पथकाने अटक केली. त्याने सदर बाजार सदर, फौजदार चावडी, विजापूर नाका आणि एमआयडीसी परिसरात पाच घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून ८६ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

* बार्शी शहर पोलिसांनी 48 तासांत दुकान फोडणारे आरोपी पकडले

बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तपासकामातील कमाल कौशल्य दर्शवित शहरातील मध्यवर्ती भागातील सात दुकाने फोडणारे चार आरोपी अवघ्या 48 तासांत पकडले आहेत. पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही आरोपी हद्दपार झालेले आहेत. तर काही इतर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वॉंटेड आहेत.या आरोपींनी दोन दिवसात बार्शी बरोबरच बारामती, कुर्डवाडी, टेंभुर्णी आदी शहरातही दरोडे घातले आहेत. अशी माहिती तपास मोहिमेचे नेतृत्व करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सर्जेराव पाटील, बार्शी शहरचे पो.नि. रामदास शेळके, तपासाधिकारी स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार, फौजदार शामराव गव्हाणे, स.पौ.फो. वरपे, पोलिस अंमलदार माळी, भांगे, ठेंगल, पवार, घोंगडे, बारगीर, गोसावी, लगदिवे, सायबर शाखेचे रतन जाधव आदी तपासकार्यात सहभागी होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शुक्रवारी मध्यरात्री 3 नंतर चाटी गल्ली, महावीर मार्ग, तेलगिरणी चौक आदी भागातील सात दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला होता. याबाबत ब्रँडलूट ब्रँडेड रेडीमेड गारमेंटस्‌चे गणेश भीमराव कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचे काही दुकानांच्या सीसीटीव्ही मध्ये झालेल्या चित्रीकरणात चोरट्यांनी वापरलेली रिटझ कार दिसून आली होती. त्यानुसार सायबर शाखेच्या मदतीने पोलिसांनी ही कार ट्रॅक केली. या कारचा मागोवा घेतल्यानंतर हिस्ट्रीवरचे गुन्हेगार तपासले असता सदरील गुन्हा 1) मारुती चंद्रशेखर दासर  2) महेंद्र उर्फ मोट्या अविनाश पाटील  दोघेही रा. हनुमान नगर, महापे, ठाणे बेलापूर नवी मुंबई 3) अभिजित गौतम कांबळे रा. सेक्टर 5, कोपरखैरणे, मयुर बारच्या समोर, नवी मुंबई 4) अजय अर्जुन कानगुलकर रा. सेक्टर नं. 23, गणेश पंचमी सोसायटी नवी मुंबई यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लागलीच त्यांच्या पत्त्यावर जावून त्यांना अटक केली. या आरोपींनी बार्शीत दुकाने फोडल्याची कबूली दिली आहे. मात्र त्यांच्याकडून अजून कोणताही मुद्देमाल जप्त झालेला नाही.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #thieves #arrested #Solapur #accused #broke #shop #Barshi #caught, #सोलापूर #चोरट्यांना #अटक #११गुन्हे #उघडकीस #बार्शीत #दुकान #फोडणारे #आरोपी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंत्री अनिल परबपाठोपाठ सोलापुरात काम केलेल्या या आरटीओ अधिका-यांच्या घरावरही ईडीचा छापा
Next Article ठाणे मनपा महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला; तीन बोटं तुटली

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?