Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या पुत्राने दाखवले शौर्य, शस्त्रसाठ्यांसह घुसखोरी करणा-या चार दहशतवाद्यांचा केला खात्मा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरच्या पुत्राने दाखवले शौर्य, शस्त्रसाठ्यांसह घुसखोरी करणा-या चार दहशतवाद्यांचा केला खात्मा

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 6:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये आज पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांचा खात्मा करणारा जवान हा सोलापूरचा आहे. शस्त्रसाठ्यांसह भारतात घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरात असलेल्या टोल नाक्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली होती. दहशतवादी एका ट्रकमधून शस्त्रसाठ्यांसह भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना सैन्याच्या जवानांनी त्यांचा खात्मा केला. त्यामध्ये, बार्शीपुत्र सीआरपीएफ (क्रोबा बटालियन) जवान मुकूंद झालटे यांनीही शौर्य दाखवत कारवाई केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हे दहशतवादी एका ट्रकमध्ये लपून बसले होते. या गाडीतूनच ते जम्मूमधून काश्मीरकडे भारतीय हद्दीत प्रवेश करत होते. याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळताच सैन्यातील जवानांनी दहतवाद्यांचा मागोवा घेत, त्यांची गाडी टोलनाक्याजवळ अडवली. त्यावेळी, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर, जवानांनी पोझिशन घेत, मोहिमेनुसार दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. सैन्यांसोबत या मोहिमेत कार्यरत असलेल्या सीआरपीएफच्या मुकूंद झालटे यांनीही धाडसी कारवाईत आपलं योगदान दिलं.

* मुकुंद झालटेविषयी माहिती

मुकुंद हे मूळ बार्शी तालुक्यातील पूरी गावचे सुपुत्र आहेत. मुकुंद यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. मुकुंद अंकुश झालटे असे या बार्शीपुत्राचे आणि देशाच्या शूरवीर जवानाचे नाव असून त्यांनी टेक्निकल हायस्कुलमध्ये आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सन 2011 साली CRPF च्या पहिल्याच टर्ममध्येच परिक्षा उतीर्ण करुन ते भरती झाले आहेत. सध्या, पॅरामिलेट्रीच्या कोब्रा बटालियनमध्ये ते देशसेवा करत आहेत. सध्या त्यांचे कुटुंब संभाजीनगर नवीन रेल्वे स्थानक रोड येथे राहत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूरच्या #पुत्राने #शौर्य #मुकुंदझालटे #शस्त्रसाठ्यांसह #घुसखोरी #करणा-या #दहशतवाद्यांचा #खात्मा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर शहरात पुन्हा संचारबंदी; २२ ते २६ नोव्हेंबर सर्व बसेस राहणार बंद
Next Article हिमाचल प्रदेशातील गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?