Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: heavy traffic सोलापुरातील जड वाहतुकींवर पोलिसांची कारवाई; पाच जणांवर गुन्हा, केला वेळेतही बदल 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

heavy traffic सोलापुरातील जड वाहतुकींवर पोलिसांची कारवाई; पाच जणांवर गुन्हा, केला वेळेतही बदल 

Surajya Digital
Last updated: 2023/01/31 at 10:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) 》 कामती पोलीस स्टेशन हद्दीत उसाच्या पिकात आढळला बेवारस महिलेचा मृतदेह□ कारखान्याच्या खोलीत मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : दिवसेंदिवस जड वाहतुक कुणाचा ना कुणाचा बळी घेत असल्याचे चित्र गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र पोलिसांनी आता शहरात जड वाहतुकींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतलात. सोलापूर शहरातील जड वाहतूक सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. Police action on heavy traffic in Solapur city; Crime against five people, time also changed

जड वाहतुकी संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. 30) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण महादेव देवकर (वय- २३,रा. तुळजापूर नाका,मड्डी वस्ती), सिद्धाराम गणपत पवार (वय-२६,रा. रेणुका नगर,जुळे सोलापूर), गणेश शिवयोगी देसाई (वय-३८,रा. रमण नगर,सोलापूर), राहुल लक्ष्मण अलंदे (वय-२१,रा.तळे हिप्परगा,तुळजापूर रोड) गोविंद मोहन शिंदे (वय-३२,रा.नीलम नगर,थोबडे वस्ती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा राज्यात टॉपटेनमध्ये आहे. मागील दोन वर्षांत सोलापूर शहरातील तब्बल १४९ जणांचा अपघाती मृत्यू झाला असून त्यात जड वाहतुकीमुळे सर्वाधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.

जड वाहतूक आणखी किती लोकांचे बळी घेईपर्यंत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गप्प बसणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील लोकप्रतिनिधी त्यावर ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात कधीतरीच येतात, अशी अवस्था आहे. त्यामुळे संभाजी बिग्रेडने आंदोलन केले. तरीपण, प्रशासनाला जाग नाही आल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 कामती पोलीस स्टेशन हद्दीत उसाच्या पिकात आढळला बेवारस महिलेचा मृतदेह

विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे शिंगोली येथील शेतातील उसाच्या पिकात बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले आहे.

आज सोमवारी ( ता. ३० ) दुपारी बाराच्या पूर्वी मयत झालेले अंदाजे २५ ते ३० वर्ष वयोगटातील रंगाने गोरी असणारी व पाच फूट दोन इंच बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

अधिक चौकशीसाठी कामती पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन कामती पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

□ कारखान्याच्या खोलीत मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – कामावर गेलेल्या एका ४० वर्षीय मजुराने कारखान्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गांधीनगर येथील राठी कारखान्यात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

खाजेंद्र उर्फ किरण रमेश गजम (वय ४० रा. गांधीनगर अक्कलकोट रोड) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो राठी यांच्या कारखान्यात वार्पर म्हणून काम करीत होता. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. दहा वाजेच्या सुमारास कारखान्यातील वरच्या खोलीत त्याने छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

 

त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णाला दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. मयत गज्जम याच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत .

 

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Police #action #heavytraffic #Solapurcity #Crime #fivepeople #time #changed, #सोलापूर #शहर #जडवाहतूक #पोलिस #कारवाई #पाचजणांवर #गुन्हा #वेळेत #बदल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर वारी : भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन
Next Article बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?