भाग 2
सगळ्यांचे कानावर हात, कातडी वाचवण्यासाठी धडपड, चिमुरडीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ‘हे’ होऊ लागलंय !
खास प्रतिनिधी
सोलापूर : ‘त्या’ चिमुरडीच्या मागावर राहून तिचे साधारण सहा महिन्यांपासून लैंगिक शोषण करणार्या ‘त्या’ शाळेतील फ्रान्सिस पिंटो या वासनांध शिपायाची मुलींच्या टॉलेट विभागाकडे ड्युटी नव्हती. त्या विभागाकडे महिला कर्मचारी नियुक्त होती, तरीपण हा नराधम मुलींच्या टॉलेटकडून जावून ‘त्या’ चिमुरडीला गाठायचा, असा गंभीर प्रकार वारंवार घडत असताना संबंधित ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्यांनी मुलींच्या टॉलेटकडे त्याच्या फिरकण्यावर आक्षेप का घेतला नाही, जाणीपूर्वक कानाडोळा का केला? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे ड्युटी नसलेल्या ठिकाणी त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या टॉलेटकडे पुरुषांनी जाणे नाही, असं असताना शाळेतील फ्रान्सिस पिंटो नावाचा लिंगपिसाट नराधम तिकडे अन्य कर्मचार्यांचे डोळे चुकवून ‘त्या’ चिमुरडीला गाठायला जायचा, हे एवढं गंभीर प्रकरण शाळेचे प्राचार्य पर्यायाने शाळा व्यवस्थापनाने इतके हलक्यात घेतलेच कशी? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
मुलींच्या टॉलेटकडे शाळेतील पुरुष कर्मचारी पिंटो हा फिरकतोय, हे त्या ठिकाणी खास ड्युटीसाठी नेमलेल्या महिलेने प्राचार्यांसह शाळा व्यावस्थापनाला का सांगितले नाही, खरं तर टॉलेट विभागाची जबाबदारी ज्या महिला कर्मचार्यांवर सोपविली आहे, त्यांनी या परिसरावर नजर ठेवणे हे त्यांच्याबाबतीत अत्यंत बंधनकारक असताना त्यांनी हे कर्तव्य का पार पाडले नाही. त्या ठिकाणच्या नियुक्त कर्मचार्यांनी हे कर्तव्य प्रमाणिकपणे, जबाबदारीने पार पाडले असते, नराधम पिंटो या कर्मचार्याच्या आक्षेपार्ह वागण्याबद्दल प्राचार्यांसह व्यवस्थापनाकडे वेळीच तक्रार केली असती तर नराधम पिंटो या शिपायाच्या तावडीत ‘ती’ चिमुरडी आली नसती. पुढे त्या लेकीचं सहा महिने लैंगिक शोषण झालं नसतं. तिला शारिरीक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या नसत्या हे आता स्पष्ट होता. टॉलेट विभागाकडील कर्मचारी ठरतात दोषीच,
संबंधितांना दाखवायला हवा कायमचा घरचा रस्ता
ज्या शाळेत लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण घडले. त्या मुलींच्या टॉलेट विभागाकडे संस्थेच्यावतीने आवर्जून महिला कर्मचार्यांची नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती पुढे आली आहे. वास्तविक टॉलेट विभागाची जबाबदारी ज्या महिला कर्मचार्यांवर आहे, त्या कर्मचार्यांना टॉलेट विभागाकडे लहानगीचा लैंगिक छळ होतोय, हे माहिती कसं नाही? शाळेतील इतर विभागात नियुक्त असलेला फ्रान्सिस पिंटो हा मुलींच्या टॉलेटकडे का फिरत होता, याबद्दल त्याला का हटकले नाही, त्याच्या फिरकण्यावर आक्षेप घेवून प्राचार्यांसह शालेय व्यवस्थापन समितीकडे तक्रार का केली नाही, त्यांनी तक्रार केली नाही, टॉलेट विभागासंबंधी दक्ष राहण्यात कुचराई केली, त्यातून चिमुरडीचं लैंगिक शोषण झालं, या गंभीर प्रकारला दोषी धरुन टॉलेट विभागाच्या त्या संबंधित महिला कर्मचार्यांवरदेखील बडतर्फीची कारवाई करुन त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखवायला हवा.
सगळ्यांचेच कानावर हात अन् कातडी बचाव भूमिका; मग पिडित चिमुरडीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची?
पिडित चिमुरडीला झालेल्या त्रासाच्या अनुषंगाने, पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा सखोल तपासदेखील सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी हे यांच्याकडून सुरु आहे. मात्र, याच टप्यावर ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका संशयित आरोपी शिपाई फ्रान्सिस पिंटो याच्यासह शाळेतील सर्व संबंधितांना घेतल्याची माहिती समोर येत आहे. शाळेतील संबंधितजण या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नाही,असे सांगत आहेत. प्रत्येकजण कातडी बचाव भूमिका पद्धतशीर बजावत असल्याचा बोलबाला या प्रकरणात आहे. शाळेतील चिमुरडीच्या नाजूक प्रकरणाबद्दल प्रत्येकजण हातवर वर करत असेल, कानावर हात ठेवत असेल, याप्रकरणाचं कसलंही बालंट आपल्यावर येणार नाही, अशीच भूमिका वठवत असेल तर ‘त्या’ पिडीत चिमुरडीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? हा मुद्दा अधोरेखीत होत आहे.