सोलापूर, 17 जून (हिं.स.)।
सोलापुरातून गोव्यासाठी प्रवासी विमानसेवा सुरू झाल्यानंतर येत्या नोव्हेंबरअखेर होटगी रोडवरील विमानतळावरून दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, स्टार एअर लायन्स कंपनी मुंबई, पुणेसाठी ऑगस्टमध्ये विमान सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे, तर त्याआधी तिरुपतीला विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकार्यांनी दिली.
सोलापूर ते गोवा या प्रवासी विमानसेवेची सुरुवात नऊ जूनपासून झाली आहे. या विमानसेवेस सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी 70 ते 80 प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे कोकण परिसर, गोव्यातून जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळी येणार्यांची संख्या वाढत आहे. अशा भाविकांची गोवा-सोलूपर विमानसेवेमुळे सोय झाली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सोलापूरातून मुंबई व पुणे या दोन शहरांसाठी प्रवासी विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोलापूर ते तिरुपती ही सेवाही सुरु होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.