सोलापूर, 4 एप्रिल (हिं.स.)।
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, सेवा आणि इतर कोचिंग उत्पन्न एकत्र करून 837.29 कोटीचा महसूल मिळवला आणि महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी प्रवाशांचा अनुभव वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि व्यावसायिक उपक्रमांना बळकटी देण्यासाठी विभागाची वचनबद्धता अधोरेखित करते.
सोलापूर विभाग भारतीय रेल्वे नेटवर्कच्या 728.53 मार्ग किलोमीटरचा विस्तार करतो. ज्यात महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये 65 स्थानके आणि सेवा समाविष्ट आहेत. विभागाच्या ऑपरेशनल कार्यक्षमता आणि सेवा उत्कृष्टतेवर सतत लक्ष केंद्रित केल्याने विविध महसूल प्रवाहामध्ये उत्कृष्ट परिणाम मिळाले आहेत.