सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)।
विवाहाच्या कारणातून आई-वडिलांशी भांडण करून प्रियंका ऊर्फ राजेश्री माडेकर हिने राज गोसावी याच्या मदतीने घरातील ५० हजार रुपये व ८० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद भगवान भानुदास भांगे (रा. निराळेवस्ती, मुरारजी पेठ) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली.
मुलगी प्रियंका व राज हे दोघे मुरारजी पेठेतील घरी आले. राजने तुमच्या मुलीशी विवाह करायचा आहे, म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी ६० वर्षीय भगवान भांगे यांनी ‘डायल ११२’वर कॉल केला. पोलिसांनी कौटुंबिक वाद असल्याने फौजदार चावडी पोलिसांत रितसर फिर्याद द्या, म्हणून सांगितले. आई-वडील पोलिस ठाण्यात गेल्यावर प्रियंकाने राज याच्या मदतीने घरातील ऐवज चोरुन नेला, असे फिर्यादीचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्रियंका माडेकर व राज गोसावी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार नागेश कामुर्ती तपास करीत आहेत.