सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील विविध भागातील १५ घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना शोधून पोलिसांनी त्यांच्याकडून ते दागिने हस्तगत केले आहेत. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते एक कोटींचे दागिने व ६५ लाखांची रोकड २३ जणांना परत करण्यात आली. त्यावेळी एक-दीड वर्षापूर्वी चोरीला गेलेले दागिने पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
२०२४ आणि २०२५ या कालावधीत शहरातील १५ जणांचे चोरीला गेलेले ११०० ग्रॅम सोन्याचे तर १००० ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांनी चोरट्यांना शोधून परत मिळविले. त्या मुद्देमालाची अंदाजे किंमत एक कोटी रुपये आहे. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडलेल्या आठ जणांनी त्यांच्याकडील ६५ कोटी रुपये गमावले होते. त्यांना देखील पुन्हा पैसे परत मिळतीलपण, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ‘सायबर’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या आठजणांचे तब्बल ६५ लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. त्यांनाही पोलिस आयुक्तांच्या हस्ते रोकड परत करण्यात आली.