सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)।
विधानसभा निवडणूकीपूर्वी सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून आता घूमजाव केल्यामुळे जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील दामाजी चौकात मशाल आंदोलन केले. तालुक्यात रात्रीच्या वेळी झालेले पाहिलेच आंदोलन ठरले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धराया माळी, प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, शहराध्यक्ष युवराज टेकाळे,तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे,संपर्क प्रमुख शकील खाटीक, कार्यअध्यक्ष अमोगसिद्ध काकणगी व बापूसाहेब घोडके आणि इतर पदाधिकारी यांनी पोलिस प्रशासनास निवेदन दिले. या संघटनेच्या वतीने राज्यभर महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून सरकारविरोधात रान पेटवण्यासाठी हे मशाल आंदोलन केले.