Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरकरांना हक्काचे पिण्याचे पाणी द्या अन्यथा आंदोलन : दिलीप माने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरकरांना हक्काचे पिण्याचे पाणी द्या अन्यथा आंदोलन : दिलीप माने

Surajya Digital
Last updated: 2023/02/22 at 8:43 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)आगीसह दिलीप माने आंदोलनसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या》 सोलापुरात टॉवेल कारखान्याला आग

● दुहेरी पाईपलाईनसाठी दिलीप माने यांचे आंदोलन

 

सोलापूर : मागील पाच वर्षात उजनी धरण 110 टक्के भरले पण, सोलापूर शहाराला 5 दिवसाआड पाणी मिळते, समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ होऊन 4 वर्ष होत आली. Give rightful drinking water to the people of Solapur otherwise protest: Dilip Mane Ujani parallel water channel अद्यापही काम सुरू नाही. कामाची किंमत दुपटीने वाढली आहे. याला स्मार्ट सिटीचे प्रशासन जबाबदार आहे. टेंडर कुणालाही द्या पण सोलापूरकरांना हक्काचे पिण्याचे पाणी द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी दिला.

 

सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम रखडले आहे. त्याबद्दल माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी माने बोलत होते.

 

दिलीप माने म्हणाले की, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासनाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ ९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. मात्र चार वर्षात या योजनेचे काम महानगरपालिकेच्या लहरीपणामुळे अद्यापही सुरु झाले नाही. याला पूर्णपणे प्रशासन आणि अधिकारी जबाबदार आहेत.

 

वास्तविक पाहता स्मार्ट सिटीचे चेअरमन असीम गुप्ता यांनी याबाबत बोर्ड मीटिंग घेणे आवश्यक आहे. मात्र ते सोलापुरात फिरकत नाहीत आले तरी ते तोंडी आदेश देतात. या जलवाहिनी साठी सरकारने दोनशे कोटी रुपये दिले आहेत. एनटीपीसीचे 250 कोटी पडून आहेत. तरीही हे काम का सुरू होत नाही, असा सवाल दिलीप माने यांनी उपस्थित केला.

 

 

उजनी जलाशय गेली पाच-सहा वर्षापासून १०० टक्के भरलेला असताना सोलापूर शहरवासियांना गेल्या अनेक वर्षापासून चार ते पाच दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा वेळी-अवेळी पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यापासून वंचीत रहावे लागते. महानगरपालिका वर्षाला सुमारे ४० कोटी रुपये पाणीपट्टी वसुल करते, परंतु वर्षातील १०० दिवससुध्दा पाणी पुरवठा करीत नाही. समांतर जलवाहिनीचे काम त्वरीत करुन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी आमची मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास आणखीन तिव्र आंदोलन करण्यात येईल, असेही माने सांगितले.

 

या आंदोलनात जयकुमार माने, केदार उंबरजे, नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने, अजित माने, संभाजी भडकुंबे, अनिल वाघमारे, समीउल्ला शेख, सुनील जाधव, अजय सोनटक्के, सचिन चौधरी, शैलजा राठोड, गंगाधर बिराजदार, महेश घाडगे यांच्यासह नागरिक सहभागी होते.

 

● स्मार्ट सिटीच्या बैठकीत निर्णय होईल : आयुक्त

 

आपल्याकडे स्मार्ट सिटीचे प्रभारी सीईओ पद आहे. हा विषय आपल्या अखत्यारीत येत नाही. ही बाब आपण स्मार्ट सिटी चे चेअरमन असीम गुप्ता यांना कळवली आहे. त्यांना बोर्ड मीटिंग त्याची मागणी केली आहे. बोर्ड मीटिंग झाल्यावरच समांतर जलवाहिनीचा निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

आगीसह दिलीप माने आंदोलनसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

》 सोलापुरात टॉवेल कारखान्याला आग

 

सोलापूर : एमआयडीसी लक्ष्मीनारायण थिएटर समोरील टॉवेल कारखान्याला आज दुपारी आग लागली. लहान सिलेंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाण्याच्या दोन गाड्या आल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोकांची मोठी गर्दी झाली. हा कारखाना टावेलचा असून दत्तू दुभाष याचा कारखाना आहे. ही आग दुपारी साडेतीन वाजता लागली.

 

आगीचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. लक्ष्मीनारायण टाॅकीजसमोरील जुना बालाजी स्पिनिंग मिल सध्या गोडाऊनला भाडयाने देण्यात आले आहे. बुधवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी साडे तीनच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साप्ताहिक सुटी असल्याने कारखान्यात वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आहेत. लोकांची मोठी गर्दी असून बचाव कार्य धावपळ करून करत आहेत. कारखाना टॉवेलचा आहे.

 

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #rightful #drinking #water #people #Solapur #otherwise #protest #DilipMane #Ujani #parallelwaterchannel, #सोलापूरकर #हक्क #पिण्याचेपाणी #द्या #अन्यथा #आंदोलन #माजीआमदार #दिलीपमाने #समांतर #जलवाहिनी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरातील सर्व नळांना मीटर लावण्यात येणार ! टेंडर प्रक्रिया लवकरच पार पडणार !
Next Article मोहोळमध्ये येऊन मुख्यमंत्री सावंतांची राजन पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्र July 15, 2025
टेस्लाचे स्मार्ट एसयूव्ही मॉडेल Y भारतात लाँच; किंमत ५९. ८९ लाखांपासून सुरू
देश - विदेश July 15, 2025
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार – प्रताप सरनाईक
देश - विदेश July 15, 2025
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
देश - विदेश July 15, 2025
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी १ ऑगस्टपासून मुंबईत धावणार
महाराष्ट्र July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?