Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर विद्यापीठाचा कोणासोबत सामंजस्य करार ? नेमका फायदा काय होणार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर विद्यापीठाचा कोणासोबत सामंजस्य करार ? नेमका फायदा काय होणार ?

admin
Last updated: 2025/03/25 at 12:11 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, दि. 24- कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभाग, महाराष्ट्राचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात कौशल्यविकास क्षेत्रात सहयोग करण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल.

या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील, जे त्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारसंधी वाढवतील. हे प्रशिक्षण उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगार साठी उत्तम संधी मिळतील.

या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे उपस्थित होते. या करारावर कुलसचिव योगिनी घारे आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे हे उपस्थित होते. यावेळी कौशल्य विकास विभाग संचालक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, कायदा अधिकारी ॲड. जावेद खैरदी, अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर, डॉ. वीरभद्र दंडे, उद्यम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, मयंक चौहान, कौशल विकास सोसायटीचे दत्तात्रय देवळे, मिलिंद अहेर, मोहसीन तांबोळी यांची उपस्थिती होती. हा करार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे आनंद मापुस्कर आणि संदीप पिसके यांचे सहकार्य लाभले.

हा करार विद्यार्थ्यांना उद्योगस्नेही कौशल्ये प्रदान करून त्यांना सक्षम बनवण्यास मदत करेल. त्यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीसही चालना मिळेल, असे कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांनी सांगितले.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी रुपये 100 कोटीचा प्रस्ताव मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Next Article राञी टाकली घरावर दगडे, मग पुढे ‘असं’ भयानक घडलं

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?