Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोमवारी अठरावा दीक्षांत समारंभ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोमवारी अठरावा दीक्षांत समारंभ

Surajya Digital
Last updated: 2022/12/09 at 3:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार

● 50 संशोधकांना पीएच.डी पदवी तर 57 सुवर्णपदकाचेही वितरण होणार

 

Contents
● 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार● 50 संशोधकांना पीएच.डी पदवी तर 57 सुवर्णपदकाचेही वितरण होणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

सोलापूर – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ सोमवारी (12 डिसेंबर ) सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. यावेळी एकूण 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University’s eighteenth convocation ceremony on Monday

याचबरोबर 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील.

 

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. प्रथम प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यावर्षी 50 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. पीएचडी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 37 मुले तर 13 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यंदा 57 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. यंदा नवीन चार सुवर्णपदकाची वाढ झालेली आहे. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये तब्बल 32 मुली तर 25 मुलांचा समावेश आहे.

मार्च 2022 ला उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर मिळेल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी सांगितले. दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सध्या या समित्यांचे काम सुरू आहे.

या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, सीए श्रेणीक शाह, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.

 

You Might Also Like

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण

उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन

केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा

हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी

TAGGED: #Punyashlok #AhilyaDeviHolkar #SolapurUniversity's #eighteenth #convocation #ceremony #Monday, #पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर #सोलापूर #विद्यापीठ #सोमवारी #अठरावा #दीक्षांत #समारंभ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । लग्न उरकून निघताना ट्रकच्या धडकेने मोटारीतील दोघे ठार; पहाटे भीषण अपघात
Next Article बड्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक वसुली मोहीम; पहिल्याच दिवशी तीन शिक्षण संस्थांची कार्यालये सील

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?