सोलापूर, 29 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर शहर व परिसरात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात किरकोळ तर शहराच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे आज वातावरण कमालीची बदलले होते. नेहमी ४३ अंश सेल्सिअसच्या घरात असलेले तापमान आज ४० अंश सेल्सिअसवर आले होते. चोवीस तासात ३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत वाऱ्याचा वेगही वाढला होता. अवकाळी पावसाच्या हजेरीने वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता. दिवसभराच्या उन्हाच्या चटक्याने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे सुखद दिलासा मिळाला.
—————