Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या विमानसेवेसाठी कोल्हापूरचे धनंजय महाडिक धावले; खा. जयसिध्देश्वर महास्वामी गप्प राहिले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूरच्या विमानसेवेसाठी कोल्हापूरचे धनंजय महाडिक धावले; खा. जयसिध्देश्वर महास्वामी गप्प राहिले

Surajya Digital
Last updated: 2022/12/14 at 6:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● सोलापूरचे प्रतिनिधी गप्पच■ खा. महास्वामींकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल : शहा

सोलापूर : कोल्हापूरचे असूनही सोलापूरवर विशेष जिव्हाळा असलेले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या संपूर्ण महिनाभर आयोजित चक्री उपोषणाची विशेष व्यक्तिगत दखल घेत राज्यसभेत सोमवारी (ता. 12) होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली. दुसरीकडे सोलापूरचे लोकप्रतिनिधी या विषयावर गप्प का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. Kolhapur’s Dhananjay Mahadik ran for Solapur’s air service; MP Jayasidheswar Mahaswamy remained silent

 

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव, गणेश पेनगोंडा आणि रोहित मोरे यांनी मुंबई येथील मुख्यालयात कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली. त्यावेळी महाडिक यांनी सर्व बाबी विषयी सखोल माहिती जाणून घेत विमानसेवेचा मुद्दा संसदीय हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करेन, असे आश्वासित केली होती.

खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. सुताचे कारखाने, उद्योग असून सोलापूर जिल्हा जगभर सोलापुरी चादर पुरविण्याचे काम करतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी विमान सेवा गरजेची आहे. त्यामुळे होटगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यात यावी. अशी मागणी राज्यसभेत केली.

 

देशातील लहान शहरांना मोठ्या शहराची जोडणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असणारी उड्डाण योजनेंतर्गत सोलापूर होटगी रोड विमानतळ विमानतळावरून नागरिक प्रवासी वाहतूक सुरू करण्यात यावी, असे यावेळी खा. महाडिक म्हणाले. सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभर चक्री उपोषण करण्यात आले होते. दरम्यान, महाडिक हे कोल्हापूरचे खासदार असून त्यांनी सोलापूर विमानसेवेचा मुद्दा उपस्थित केल्याने शहातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● सोलापूरचे प्रतिनिधी गप्पच

 

खा. महाडिक यांनी सोलापूर विमानसेवेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सोलापूरचे लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का असा प्रश्न आता व्यापारी आणि सोलापूरकर उपस्थित करत आहेत. विकासाच्या नावाखाली निवडून यायचे आणि नंतर मात्र त्यापासून फारकत घ्यायची असले काम सोलापूरचे प्रतिनिधी करत असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले.

 

■ खा. महास्वामींकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल : शहा

खा. धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे आहेत. मात्र सोलापूर विमानतळा संदर्भात त्यांना आस्था आहे. ज्या तमाम सोलापूरकरांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना खासदार केले. ते मात्र सोलापूर होटगी रोड विमानतळ प्रश्नासंदर्भात मौन धारण करून शांत आहेत अनास्था दाखवत आहेत, अशी टिका सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी केली.

 

सोलापूर होटगी रोड विमानतळा संदर्भात मध्यंतरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीतही खा. डॉ. महास्वामी यांनी पालकमंत्र्यांची दिशाभूल केली. त्यामुळे त्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही, असा आरोप ही शहा यांनी केला. मोदी यांनी सुरू केलेल्या उड्डाण योजनेला खीळ घालण्याचे काम खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे करीत आहेत. ही बाब मतदार लक्षात ठेवतील, असेही ते म्हणाले.

 

You Might Also Like

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

TAGGED: #Kolhapur #mp #DhananjayMahadik #ran #Solapur's #airservice #MPJayasidheswarMahaswamy #remained #silent, #सोलापूर #विमानसेवा #कोल्हापूर #खासदार #धनंजयमहाडिक #धावले #जयसिध्देश्वरमहास्वामी #गप्प
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर बंद वरून मतभेद : हिंमत असेल तर स्वतःच्या अजेंड्यावर ‘सोलापूर बंद’ करून दाखवा
Next Article राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही; 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती कायम !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?