Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक

admin
Last updated: 2025/06/24 at 5:27 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई , 24 जून (हिं.स.)। दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सोमवारी (दि. २४) एका सुरू असलेल्या तपासात मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे ही अटक केली.

कायदेशीर प्रक्रियेनुसार, अटक केल्यानंतर श्रीकांतला न्यायालयात दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यापूर्वी किलपॉक मेडिकल कॉलेज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. चेन्नईतील एग्मोर येथील ज्युडिशियल ऑफिसर्स क्वार्टर्समधील दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सुनावणी झाली. वकील विघ्नेश रामनाथन यांनी श्रीकांतची बाजू मांडली. सुनावणीनंतर, त्याला ७ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एआयएडी एमके च्या आयटी विंगचा पदाधिकारी टी. प्रसाद याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई झाली. प्रसादवर श्रीकांतला प्रतिबंधित अंमली पदार्थ पुरवल्याचा आरोप आहे. प्रसादच्या चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांना अभिनेत्याच्या ड्रग्ज नेटवर्कमधील सहभागाचे पुरावे सापडले. या माहितीच्या आधारे अभिनेता श्रीकांतला ताब्यात घेण्यात आले. नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात त्याची नऊ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले. नंतर या नमुन्यांची तपासणी केली असता, त्यात अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

४६ वर्षीय श्रीकांतने १९९९ मध्ये दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या ‘जन्नल – मराबू कविताइगल’ या दूरचित्रवाणी मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये, विशेषतः तमिळ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २००२ मध्ये ‘रोजा कूटम’ या रोमँटिक ड्रामाद्वारे त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, ज्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली आणि तमिळ चित्रपटसृष्टीत त्याचे स्थान निर्माण झाले. त्याने ‘आनंदपुरम डायरीज’, ‘उप्पूकंदम ब्रदर्स बॅक इन ॲक्शन’ यांसारख्या अनेक मल्याळम चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रदीप चिलकुरी दिग्दर्शित ‘अर्जुन S/O वैजयंती’ हा त्याचा अलीकडचा चित्रपट आहे.

You Might Also Like

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज

नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार

भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी

इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा

इराण- इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
Next Article नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद
महाराष्ट्र June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?