Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

admin
Last updated: 2025/06/16 at 4:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

* पुण्यातील कोंढवा धावडे ऊत्तमनगर पुल तसेच , जळगाव, नाशिक, हिंगोली, वर्धा जिल्ह्यांतील पुलांच्या धोकादायक स्थितीची गंभीर दखल

मुंबई, 16 जून (हिं.स.) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, संबंधित पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला असतानाही काम न झाल्याने ही दुर्घटना घडली असून यासंदर्भात चौकशी करण्यात यावी.

डॉ. गोऱ्हे यांनी केवळ कुंडमळा पुलच नव्हे तर राज्यातील इतर धोकादायक पुलांचीही माहिती देत त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

खडकवासला धरण पायथ्याजवळील कोंढवे धावडे ते उत्तमनगर या रस्त्यावरचा पुल देखील धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे

त्याचबरोबर, जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील बांभोरी पुल, नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील पुल, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मार्गावरील कयाधू नदीवरील पुल, वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील तांबा गावाजवळील पुल ही देखील धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देत या सर्व पुलांची तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकतेनुसार नवीन पुलांचे बांधकाम अथवा दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची शिफारस केली आहे. याबरोबरच त्यांनी विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर तसेच संबंधित जिल्हाधिकारी पुणे, वर्धा, हिंगोली, नाशिक व जळगाव यांना या बाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्याची शिफारस देखील केली आहे.

राज्यातील नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी व भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी धोरणात्मक व प्रभावी निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत महत्त्वाची असून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

You Might Also Like

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला

परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नांदेड गुरुद्वारास भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
Next Article विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप

Latest News

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?