Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आता ईडीनेही घातले लक्ष; मुंबई पोलिसांकडून रियाला मदत ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीटॉलीवुड

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आता ईडीनेही घातले लक्ष; मुंबई पोलिसांकडून रियाला मदत ?

Surajya Digital
Last updated: 2020/07/30 at 6:50 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असताना सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी याप्रकरणात पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनीही हाती घेतला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर आर्थिक आरोपही केले असून, ईडीनं (सक्तवसुली संचालनालय) या प्रकरणात लक्ष घातलं आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेले आरोपपत्रातील माहिती मागवली आहे. इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलीस चौकशी करत असताना सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून रिया विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सुशांतच्या वडिलांनी रियानं सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणात ईडी आर्थिक अंगानं तपास करणार आहे. ईडीनं बिहार पोलिसांकडून सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतील माहिती मागवली आहे. या माहितीची चौकशी ईडीकडून केली जाणार असून, बिहार पोलिसांना पाठवलेल्या पत्रात ईडीनं सुशांतचे सर्व बँक खात्यांची माहिती मागवली आहे.

* मुंबई पोलिसांकडून रिया ला मदत ?

सुशांत सिंह याचे वडील के.के. सिह यांचे वकील विकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना दावा केला की,”जर ती (रिया चक्रवर्ती) सर्वोच्च न्यायालयात गेली असेल,तर तिने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करायला हवी. पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे आणि आता तिने (रिया) बिहार पोलिसांच्या चौकशीला स्थगिती देण्याची व याचा तपास मुंबई पोलिसांकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मग मुंबई पोलिसातील कुणीतरी तिला मदत करत आहे, यासाठी यापेक्षा मोठा पुरावा कोणता हवाय,”असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

TAGGED: #सुशांतसिंह #ईडीकडेतपास #रियालामदत #मुंबईपोलिस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 850 पार तर 31 जणांचा मृत्यू
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ लाखांचे आश्वासन असे पूर्ण केले; काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींचे अभिनंदन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?