Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशांतच्या खात्यातून रिया आणि तिच्या भावाच्या खात्यात लाखो रुपये ट्रान्सफर; रियाचे इडी तपासात असहकार्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुडगुन्हेगारी

सुशांतच्या खात्यातून रिया आणि तिच्या भावाच्या खात्यात लाखो रुपये ट्रान्सफर; रियाचे इडी तपासात असहकार्य

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 11:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने बिहार पोलिसांकडून कागदपत्रे घेतली आहेत. यातून रिया आणि तिच्या भावाच्या अकाऊंट मोठ्या रकमा ट्रान्सफर झाल्याचे समोर आले आहे. रिया तपासात इडीला सहकार्य करीत नसल्याचे समोर येत आहे.

तसेच सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या भावाची सुमारे नऊ तास चौकशी केली आहे. रियाचे सीए रितेश शाह, सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांचीही मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशी अनेक नवीन मुद्दे समोर आले आहेत. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या अकांउटवर सुशांतसिंह राजपूतने लाखों रूपये ट्रान्सफर केल्याची माहिती समोर आली आहे. सुशांतसिंह राजपूत याने शौविक चक्रवर्ती याच्या अकांउटमध्ये नुकतेच 40 हजार रूपये ट्रान्सफर केल्याचे उघडकीस आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुशांतला कोटक महिंद्रा बॅकेतील आपले खाते बंद करायचे होते. त्याला दुसरे नवीन खाते उघडायचे होते, असेही तपासात समोर आले आहे. नंतर सुशांतने याबाबतचा आपला अर्ज मागे घेतला होता. तपासात रिया चक्रवर्ती ईडीला सहकार्य करीत नसल्याची माहिती आहे. नऊ तास सुरू असलेल्या चौकशीत रियाने मला काही आठवत नाही, असे सांगून अनेक प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते.

रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा आरोप आहे. सुशांतच्या अकांउटमध्ये 50 कोटी रूपये होते. ते आता फक्त 1 कोटी रूपये असल्याचे समजते. सुशांतच्या खात्यातून रिया आणि तिचा भाऊ शैाविकच्या खात्यात पैसै ट्रान्सफर झाले आहेत.

सुशांत आणि रिया चक्रवर्ती याची पहिली भेट 4 एप्रिल 2019 मध्ये झाली होती. त्यानंतर सात ते आठ दिवसांत ती सुशांतच्या सोबत सुशांतच्या घरी राहायला आली होती.
ईडी कडून चौकशी केली असता अनेक गोष्टी समोर येत आहेत. अजूनही अनेकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

* खर्चाविषयी रियाकडून निरर्थक उत्तर

चौकशी दरम्यान रिया म्हणाली की, सुशांतने तिच्यावर जे पैसे खर्च केले ते स्वमर्जीने केले होते. मात्र जेव्हा रियाला तिच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ती योग्य उत्तरे देऊ शकली नाही. रियाने कोणतीच गोष्ट लपवली नाही असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी म्हटले आहे. रिया चक्रवर्तीचा कॉल डिटेल रेकॉर्ड समोर आला आहे. रेकॉर्डनुसार, रिया दोन सायकॅट्रिस्टच्या संपर्कात होती. महेश भट्ट यांच्याशी तिने अनेकदा बोलणे झाले होते.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

TAGGED: #सुशांत #लाखोरुपये #ट्रान्सफर #रिया #तपासात #असहकार्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल
Next Article आठ शौर्य पदकप्राप्त मराठी पायलटचा केरळ दुर्घटनेत मृत्यू; दोन्ही पुत्र देशासाठी गमावले, गृहमंत्र्यांनी केले सांत्वन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?