सातारा, १४ मे (हिं.स.) : जगप्रसिद्ध टेस्ला कंपनी लवकरच सातारा जिल्ह्यात आपले सीकेडी (Completely Knocked Down) युनिट सुरू करणार आहे. गाड्यांचे सुटे भाग भारतात आणून जोडण्याचा हा प्रकल्प असून, कंपनीने यासाठी मोठ्या भूखंडांचा शोध सुरू केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.
सुरुवातीला टेस्ला काही गाड्या आयात करणार असून, पूर्ण उत्पादन प्रक्रिया १८ महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. स्थानिक तरुणांसाठी तांत्रिक व इतर सहाय्यक नोकर्या उपलब्ध होतील. कंपनीने मध्यम पदांसाठी नोकर भरतीही सुरू केली आहे.
हैदराबादमधील करार फिस्कटल्यानंतर सातार्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पुण्याजवळील चाकणचा प्रस्ताव मागे पडल्याचे समजते. टेस्ला सध्या मुंबईत शोरूम सुरू करण्याच्या तयारीत असून, पुढील काळात बंगलोर व दिल्लीवरही लक्ष केंद्रित करणार आहे.
या प्रकल्पामुळे सातार्याला औद्योगिक नकाशावर नवी ओळख मिळेल, तसेच पायाभूत सुविधांमध्येही लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.