शिवाजी भोसले
फलटण / सोलापूर : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणाचे ‘अंडरकरंट’ समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळक यांच्या कसा संबंध आहे, यासंबंधीची धक्कादायक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संबंधित महिलेसोबत त्यांचे झालेले संभाषण आहे. या व्हायरल ऑडिओ क्लीपने रामराजेंच्या ‘चोरी चोरी…चुपके चुपके…’ प्रकरणाचे अक्षरश: बिंग फुटले आहे. मंत्रि गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजेंनी संबंधित महिलेवर ‘माया’ ओतल्याचे संभाषणातून ऐकायला मिळत आहे. ती महिला आणि रामराजेंच्यामधील अनेक खळबळजनक विधाने व्हायरल ऑडिओमधून समोर आली आहेत.
विशेष म्हणजे रामराजेंना समन्स पाठवण्यात आले. त्यांना चौकशीसाठी शनिवार (ता.3) सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिस ठाण्यात बोलाण्यात आले. यादरम्यान काही तासातच ऑडिओ क्लीपचा बॉम्ब फुटल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. या धक्कादायक ऑडिओ क्लीप बॉम्ब फुटल्याच्या ठिकर्या सातारा, सोलापूर जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात उठल्या आहेत. या ऑडिओ क्लीप संदर्भात खरं खोटं हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. मात्र, या ऑडिओ क्लिपमुळे रामराजेंच्या भोवती संशयाचे मोठे वलय निर्माण झाले आहे
मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि संबंधित महिला यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ‘मी थोडीसी सोय करतो,’ असे विधान रामराजेंनी केल्याचे दिसत आहे, त्यामुळे संबंधित महिलेला रामराजेंनी आर्थिक मदत केल्याचे त्या संभाषणातून दिसून येत आहे. यातील संभाषणावरून हा व्हिडिओ दिवाळीतील असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, गोरे प्रकरणातील महिलेशी बोलतानाचा ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वडूज पोलिसांनी शुक्रवार (ता.2) रामराजे यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज शनिवारी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने निंबाळकरांच्या अडचणी वाढणार असल्याचे मानले जात आहे.
संभाषणाच्या केंद्रस्थानी ‘प्रदीप’ व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये रामराजे हे ‘प्रदीप’ असे नाव घेत आहेत. तुम्ही इतकं धाडस केलंय. तुम्ही घरीच थांबा, प्रदीप तुमच्याकडे येईल. तुमची थोडी सोय करतो, असे ते म्हणताना दिसून येत आहेत. त्याहून मोठं म्हणजे दिवाळीनंतर कूपमध्ये तुमची सोय करतो, कूपर माझ्या शेजारीच आहे, असेही ते महिलेशी बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महिला म्हणतेय, माझं आर्थिक गणित बिघडलंय,
दिवाळीतसुद्धा मी मोकळी आहे…मी आहे डिस्टर्ब
संभाषणादरम्यान महिला म्हणतेय की, मी एका ठिकाणी नोकरीसाठी गेले होते, पण त्याच्या माणसांनी तेथे येऊन सांगितले की, तुम्ही त्या बाईला कामावरून ठेवू नका. संबंधित लोकांनी एका महिन्यात मला कामावरून काढून टाकलं होतं. या प्रकरणात मी संपूर्णपणे डिस्टर्ब झाले आहे. माझे आर्थिक गणित कोलमडले आहे. मी काही ठिकाणी कामं मिळवली होती. पण जयकुमारनी माझ्या विरोधात गुन्हा नोंदवला आणि त्याच्या बातम्या छापून आल्यामुळे माझी कामे गेली. मी हे पैशासाठी करतेय, असा प्रचार त्यांनी सुरू केला. दिवाळी असतानाही मी सध्या मोकळी झाले आहे, असेही संबंधित महिला या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहे.
रामराजे म्हणताहेत, ‘त्याला कोण घाबरतंय’
ब
कुपरमध्ये तुमचं दिवाळीनंतर काम होईल. तुमची सोय होऊन जाईल. पुण्यात माझ्या ओळखीचं एक हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी काम करू शकता, असं रामराजे संबंधित महिलेशी बोलताना म्हणत आहेत. त्यावर मी पुण्यात जायला तयार आहे. सातार्यात मला त्याची लोक त्रास देत आहेत, असेही संबंधित महिला बोलताना स्पष्ठपणे ऐकायला येत आहे. हे सांगताना मात्र रामराजेंचे नाव पुढे येऊ नये, असेही ती म्हणत आहे. मात्र, जयकुमार गोरेंनी माझंही नाव घेतलं आहे, असे रामराजे सांगत आहेत. त्यावर त्यांनं घेऊद्यात. पण मी म्हटलं पाहिजे की आपल्या दोघांमध्ये कॉन्टक्ट आहेत. त्यावर रामराजेही ‘त्याला कोण घाबरतंय’ असे म्हणत आहेत.
रामराजेंचे पोलिसांना पत्र,
मी मुंबईला दवाखान्यात,तिथेच या स्टेटमेंट घेण्यासाठी
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यासह 12 जणांना वडूज पोलिसांनी समन्स पाठवून शनिवार (ता.3) चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात कळवले होते. मात्र, समन्सच्या अनुषंगाने, ते वडूज पोलीस ठाण्यात हजर झाले नाहीत.अॅड. मोहन तुकाराम यादव आणि अॅड. रोहित जगन्नाथ माने यांच्यामार्फत या पोलिस ठाण्याच्या नावे रामराजेंनी पत्र दिलं आहे.‘मी सध्या मुुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहे, सध्या स्थितीत वडजी पोलिस ठाण्यात येऊन स्टेटमेंट देणे मला शक्य नाही, माझ्या आजाराचा आणि वयाचा विचार करता मुंबई येऊन माझे स्टेटमेंट घ्यावे’ असे दिलेल्या पत्रात नमुद असल्याचे या पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दैनिक ‘सुराज्य’ला सांगितले. रामराजेंच्या या पत्रावर पुढची काय भूमिका घ्यायची, हे आताच सांगू शकत नाही मात्र, जे होईल ते लिगली होईल,असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.