Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेने आता चीनवर आकारला तब्बल २४५ टक्के टॅरिफ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अमेरिकेने आता चीनवर आकारला तब्बल २४५ टक्के टॅरिफ

admin
Last updated: 2025/04/16 at 3:40 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंगटन डी.सी. , 16 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेने चीनवर मोठी आर्थिक कारवाई करत त्यांच्या वस्तूवर २४५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. अमिरेकेने लावलेल्या आधीच्या टॅरिफवर चीनकडून करण्यात आलेल्या प्रतिकारत्मक कृतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावण्याच्या निर्णयासोबतच, आयातीतून येणाऱ्या प्रक्रियायुक्त महत्त्वाच्या खनिजांवर (जसे कोबाल्ट, लिथियम, निकेल) आधारित वस्तूंमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याची चौकशी सुरू केली आहे.व्हाईट हाऊस म्हटले आहे की, “अमेरिका विदेशी स्रोतांवर खूप जास्त अवलंबून आहे आणि अशा दीर्घकालीन अवलंबनामुळे पुरवठा साखळीत मोठे धक्के बसू शकतात.

हे देशाच्या सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीसाठी धोकादायक ठरू शकते. “ट्रम्प यांनी चीनसोबतच भारत, ब्राझिल आणि इतर देशांवरही आरोप केला आहे की ते अमेरिकन वस्तूंवर अधिक कर लावत आहेत, जेवढे अमेरिका त्यांच्या वस्तूंवर लावत नाही.त्यांच्या मते, समान टॅरिफ धोरण अवलंबल्याने इतर देशांना त्यांचे कर कमी करावे लागतील किंवा त्यामुळे अमेरिकेतील उत्पादन उद्योगाला चालना मिळेल.

याआधी अमेरिका आणि चीन यांच्यात ‘टिट फॉर टॅट’ टॅरिफ वॉर सुरु झाले होते. अमेरिकेने चीनवर 145 टक्के कर लागू केला. त्यानंतर चीनने सर्व अमेरिकन वस्तूंवर 125 टक्के कर लागू केला.याशिवाय, चीनने काही महत्त्वाच्या उत्पादनांची (विशेषतः संरक्षण उद्योगात वापरली जाणारे घटक, बोईंग जेट) निर्यात बंद केली आहे.हे नवीन टॅरिफ मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी, लष्करी उपकरणे आणि स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ धातूंवर लागू होणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांपासून ते तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत अनेक स्तरांवर याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही घोषणा केवळ व्यापार धोरणापुरती मर्यादित नाही, तर ती जागतिक राजकारण, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने खूप मोठा परिणाम घडवू शकते.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शाळेतून तीन वर्षांत १२ हजारांनी घटले विद्यार्थी
Next Article अमरावती आता जगाच्या नकाशावर – मुख्यमंत्री

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?