Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघे ‘एसीबी’च्या जाळ्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघे ‘एसीबी’च्या जाळ्यात

Surajya Digital
Last updated: 2023/04/06 at 9:47 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 द्राक्ष बाग फेल गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, मोहोळ तालुक्यातील मनगोळी येथील दुर्दैवी घटना

सोलापूर : नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने बार अँड रेस्टॉरंटच्या स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टर वर शिक्के मारण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. Three Excise inspectors caught in ‘ACB’s net while taking bribes Anti-corruption department Solapur

निरिक्षक संभाजी साहेबराव फडतरे, कॉस्टेबल प्रियंका बबन कुटे, सहा. दुय्यम निरीक्षक सिद्धाराम अंदेनप्पा बिराजदार असे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचार्‍यांची नावे आहेत.  अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून बार अँड रेस्टॉरंटच्या अनुषंगाने असलेले स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरमध्ये नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग येथून शिक्के मारून घेण्यासाठी (प्रमाणित करून) देण्याकरिता विभागातील महिला जवान प्रियांका कुटे व बिराजदार यांनी स्वतःसाठी व साहेबांसाठी चार हजारांची लाचेची मागणी केली.

निरीक्षक फडतरे यांनी सदर लाच रक्कमेमध्ये तडजोड करून तीन हजार रुपये रक्कम कुटे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर गुरूवारी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये कुटे यांनी लाच रक्कम स्वीकारली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार सोनवणे, घाडगे, मुल्ला, किनगी, पवार, घुगे व चालक उडानशिव यांनी केली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

Visit us : www.surajyadigital.com

 

》 द्राक्ष बाग फेल गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, मोहोळ तालुक्यातील मनगोळी येथील दुर्दैवी घटना

 

सोलापूर : द्राक्षाला दर नसल्याने, तसेच चालू वर्षी बाग ‘फेल’ गेल्याने बाग लागवडीसाठी घेतलेले खासगी व विविध बँकांचे कर्ज कशाने फेडावयाचे या धास्तीने एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने त्याच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ४ एप्रिल) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

सचिन अशोक खांडेकर (वय ३५, रा. मनगोळी, ता. मोहोळ) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन खांडेकर यांनी तीन वर्षांपूर्वी द्राक्ष बाग लागवड केली आहे. बागेची लागवड करताना खर्चासाठी त्यांनी खासगी व विविध बँकांचे कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून द्राक्षाला दर नसल्याने तसेच बाग फेल गेल्याने बँकाच्या कर्जाचे हप्ते वेळेत न गेल्याने सचिन हा निराश होता. .

तसेच चालू वर्षी अवकाळी पाऊस पडल्याने व पिकाचे नुकसान झाल्याने तो जास्तच निराश होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहुल शेंबडे यांना बबलू रमेश खांडेकर यांनी सचिन याने त्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगितले, तातडीने सचिन यास मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत झाल्याचे घोषित केले.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Three #Exciseinspectors #caught #ACB #net #bribes #Anti-corruption #department #Solapur, #सोलापूर #लाच #एक्साईज #निरीक्षक #तिघे #एसीबी #जाळ्यात #लाचलुचपत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महापालिका आयुक्तांनी काढले कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
Next Article गजबजलेल्या आसरा चौकात भाच्याने मामाचा गळा चिरला

Latest News

माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन
महाराष्ट्र June 24, 2025
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 24, 2025
crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?