Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा लाक्षणिक बंद !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा लाक्षणिक बंद !

Surajya Digital
Last updated: 2023/06/14 at 10:04 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
○ अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा सराफ असोसिएशनचा इशारा○ आ. विजयकुमार देशमुख यांनी केली कारवाईस्थळाची पाहणीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा सराफ असोसिएशनचा इशारा

○ आ. विजयकुमार देशमुख यांनी केली कारवाईस्थळाची पाहणी

 

सोलापूर : महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने काल मंगळवारी शहरातील सराफ बाजार परिसरातील अतिक्रमण हटवल्याच्या निषेधार्थ आज बुधवारी सराफ कट्टा, चाटी गल्ली, मधला मारुती परिसरातील व्यापाऱ्यांनी लाक्षणिक व्यापार बंद केला. Symbolic bandh of traders in protest against encroachment by Solapur Municipal Movement Saraf Association महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, असा आरोप करत संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सराफ असोसिएशनने दिला आहे.

 

सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने काल मधला मारुती, सराफ कट्टा फुलबाजार या परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानाच्या समोर केलेले अतिक्रमण हटविले. याचा रोष येथील व्यापाऱ्यात असून आज महापालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ सराफ बाजार, चाटी गल्ली, मधला मारुती परिसरातील व्यापार बंद ठेवण्यात आला.

 

आज व्यापाऱ्यांनी काल पाडकाम झालेल्या ठिकाणी पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. अनाधिकृत शेड पाडताना अधिकृत इमारतीलाही धक्का पोहोचवला आहे, असा आरोप सराफ व्यापाऱ्यांनी केला. महापालिका प्रशासनाने या प्रकाराची माहिती घेऊन व्यापारी वर्गाची माफी मागावी आणि याप्रकरणी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

 

 

दरम्यान, आपापली दुकाने बंद करून व्यापारी कट्ट्यावर बसल्याचे दिसून आले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी , महेश धाराशिवकर, प्रेम झाड, सिद्धाराम शिवदारे, मोहन डांगरे, प्रताप चव्हाण, राजू पवार , अमित वेर्णेकर, सोमनाथ गवळी आदींसह व्यापारी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

वनौषधी तसेच सराफ बाजारातील बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हार,फुले विक्रेत्यांचीही दुकानंही बंद दिसून आली. एरवी गर्दी,गजबज असलेल्या या चौकात आज वर्दळ कमी दिसून आली. रस्त्यावर पथारी मांडून विक्री व्यवसाय करणारे तसेच चार चाकी गाडी लावणारे यांनाही काल हटवण्यात आले. काल अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढले पण काही ठिकाणी आज ते पूर्वतत दिसून आले.

 

● मनमानीपणे कारवाई झाली : आ. विजयकुमार देशमुख

 

आमदार विजयकुमार देशमुख यांनी दुपारी सराफ बाजार परिसर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान, या संदर्भात बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, सराफ कट्टा परिसरातील अतिक्रमण महापालिका प्रशासनाने काढले. नियमानुसार असलेले बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्याची मोडतोड केली. मनमानीपणे कारवाई झाली. व्यापाऱ्यांनी दोन तास वेळ मागूनही देण्यात आला नाही, असेही आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे

 

● दुपारी महापालिका आयुक्तांसमवेत बैठक

दरम्यान, सराफ कट्टा परिसरात मनमानीपणे कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी गुरुवारी (दि. 15 जून) रोजी दुपारी 3 वाजताची वेळ दिली आहे. बेकायदेशीर कारवाई होऊ नये अशी सूचना यावेळी करण्यात येईल, अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.

○ अन्यथा उग्र आंदोलन : देवरमणी

 

महापालिका प्रशासनाने रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्याचे नियोजन करावे. खरोखर अतिक्रमण असेल तर कारवाई अपेक्षित आहे. दुकानासमोरील वाहन पार्किंगचे नियोजन व्यापारी करतील. प्रशासन दुटप्पी भूमिका घेत आहे. अशीच भूमिका ठेवली तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी दिला आहे.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

TAGGED: #Symbolic #bandh #traders #protest #encroachment #Solapur #Municipal #Movement #Saraf #Association, #सोलापूर #अतिक्रमण #कारवाई #महानगरपालिका #निषेधार्थ #व्यापारी #लाक्षणिक #बंद #सराफअसोसिएशन #आंदोलन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बायको वरातीत नाचल्याने नवऱ्याने केली पट्ट्याने मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
Next Article ‘सिद्धेश्वर’ची चिमणी जेसीबीच्या विळख्यात, लवकरच होणार जमीनदोस्त, 135 जणांना नोटीस देऊन सोडले

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?