Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेता समीर शर्मा यांची घरात आत्महत्या; घरातून वास आल्यानंतर उघड झाली घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुडगुन्हेगारी

अभिनेता समीर शर्मा यांची घरात आत्महत्या; घरातून वास आल्यानंतर उघड झाली घटना

Surajya Digital
Last updated: 2020/08/06 at 5:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. ४४ वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

समीर शर्माने ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राईट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूं – एक बार फिर’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांत त्याने भाऊ, वडील, नायिकेचा भाऊ अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अभिनेता समीर शर्मा याने मालाड पश्चिम येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे आता खळबळ उडाली असून त्याने किचनच्या सिलिंगला लटकून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता इमारतीचे सेक्रेटरी दिनेश बुबना यांनी याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, समीर याच्या घरातून वास येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली. त्यानंतर त्याच्या घरी जाऊन पाहिले असता त्याने आपले जीवन संपवल्याचे दिसून आले.

समीर याच्या घरातून वास येत असल्याने इमारतीच्या गार्ड त्याच्या येथे पोहचला. त्यावेळी किचनचा दरवाजा खुला असून समीर याने सिलिंकला लटकून आत्महत्या केल्याचे दिसून आले. समीर याच्या आत्महत्येप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. समीरचा मृतदेह पाहता त्याने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय मालाड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, समीर शर्मा याने ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘सास भी कभी बहु थी’, ‘कहानी घर-घर की’ सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. यापूर्वी अभिनेता सुशांत याने सुद्धा राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आता समीर शर्मानेही आत्महत्या केली आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

TAGGED: #छोटापडदा #टीव्हीस्टार #समीरशर्मा #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमध्ये नऊ मृत्यू तर नव्याने 283 बाधित रूग्ण
Next Article सोलापूर शहरात 52 रुग्णांची वाढ तर 106 जणांची कोरोनावर मात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?