Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ : 350 विद्यार्थ्यांच्या सृजनरंगांची बरसात; तयारी पूर्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ : 350 विद्यार्थ्यांच्या सृजनरंगांची बरसात; तयारी पूर्ण

Surajya Digital
Last updated: 2021/09/04 at 10:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन 2020-21 च्या सतराव्या युवा महोत्सवास सोमवार, 6 सप्टेंबर 2021 पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. कोविडमुळे ऑनलाईन पद्धतीने रंगणाऱ्या या तीन दिवसीय युवा महोत्सवात 40 महाविद्यालयातील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून एकूण 16 कलाप्रकारांचे सादरीकरण यात होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

सोमवार 6 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ऑनलाइन पद्धतीने महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने कलाप्रकारांच्या सादरीकरणाला सुरुवात होणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नृत्य, ललित, गायन आणि वांग्मय अशा चार विभागात कलाप्रकारांची वर्गवारी करण्यात आली आहे, त्यानुसार कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यार्थी आपल्या घरी राहूनच दिलेल्या लिंकवर विहित वेळेत आपल्या कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत.

सोमवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मराठी वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, स्थळचित्रण या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. दुपारी दोन वाजता शास्त्रीय सुरवाद्य आणि भित्तीचित्रण या स्पर्धांना सुरुवात होईल. मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुगम गायन, व्यंगचित्रण, हिंदी वक्तृत्व तर दुपारी दोन वाजता इंग्रजी वक्तृत्व आणि शास्त्रीय तालवाद्य स्पर्धा रंगणार आहेत. बुधवारी, 8 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाद-विवाद, कातरकाम आणि दुपारी रांगोळीच्या स्पर्धा होतील, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांनी दिली.

वांग्मय विभागाचे नियोजन देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी कॉलेज यांच्याकडून, नृत्य विभागाचे नियोजन वसुंधरा कला महाविद्यालय, गायन विभागाचे नियोजन विद्यापीठ कॅम्पसमधील ललित कला व कला संकुलाडून तर ललित विभागाचे नियोजन संगमेश्‍वर महाविद्यालयाकडून होणार आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्र पर्यवेक्षक आणि तंत्र सहाय्यकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. कोरे यांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #University #YouthFestival #starts #students #rain #creativecolors #Preparations #complete, #विद्यापीठाच्या #युवामहोत्सव #सोमवार #प्रारंभ #सृजनरंगांची #बरसात #तयारी #पूर्ण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही : शरद पवार
Next Article मुंबई ठरला देशातील 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?